पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पेण येथील जिते पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.02(जिमाका):- "अतिवृष्टी, दरड पडणे व पूरपरिस्थिती यामुळे जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, कर्जत, पेण व इतर तालुक्यातील अनेक गावातील कुटुंबावर संकट ओढवले आहे. शासन पातळीवर त्यांना मदत निश्चितच मिळेलच परंतु त्यांना तातडीने आधार मिळावा, यासाठी सुनील तटकरे प्रतिष्ठान तर्फे जिल्ह्यासह पेण मधील जिते पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप करण्यात येत आहे. झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण होऊन तहसिलदार यांच्यामार्फत यादीतील कुटुंबाना ही मदत दिली जाणार आहे. अशा संकटात धैर्याने उभे राहून आपण सर्वांनी उभारी घेतली पाहिजे " असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिते येथे अन्नधान्य किट वाटप कार्यक्रमात केले.

सुनील तटकरे प्रतिष्ठान तर्फे जिल्ह्यातील पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार पेण येथील पूरग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. यावेळी पेण तहसिलदार डॉ.अरुणा जाधव, दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंदराव पाटील, नरेंद्र ठाकूर, उदय जवके,  दयानंद भगत, जितेंद्र ठाकूर, जिल्हा नियोजन समिती सदस्य बंड्याशेठ पाटील, विकास पाटील,  चैताली पाटील, सुचिता चव्हाण,  नगरसेविका वसुधा पाटील, वडखळ सरपंच राजेश मोकल, नथुराम म्हात्रे, मधुकर रूठे,  मळेघर सरपंच शरद पाटील, श्री.तांबोळी, अनिलशेठ पाटील, सुधर्मा सकपाळ, धर्मेद्र म्हात्रे, प्रभाकर ठाकूर, अशोक डंगर,  अमित भगत, मालती म्हात्रे आदींसह शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक