पूरग्रस्त भागातील जनावरांच्या काळजीसाठी पशुसंवर्धन विभागाने कसली कंबर 20 पथकांकडून जवळपास 2 हजार 200 जनावरांवर करण्यात आले उपचार

 

 

अलिबाग,जि.रायगड,दि.02(जिमाका):-   जिल्हयात दि.21 व 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड शहरात पूरामुळे तर अन्य तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले.  या नुकसानीत मोठ्या प्रमाणात जनावरांचेही नुकसान झाले. मृत जनावरांचे पंचनामे करणे, मृत जनावरांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे, जखमी व जिवंत जनावरांना औषधोपचार करणे, त्यांचे लसीकरण करणे, या कामांना पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकारी निधी चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के,जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ.बंकट आर्ले यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने सुरुवात केली.

झालेल्या पशुहानीचा दि. 30 जुलै  2021 रोजी पर्यंतचा अहवाल पुढीलप्रमाणे-

अतिवृष्टीबाधित 9 तालुक्यातील 44 गावांमधील एकूण मृत जनावरे- गाय-106, म्हैस-123,  बैल-50, वासरे/रेडके- 25, शेळया/मेंढया- 134, खेचर/गाढवे-4, घोडे-2, कोंबड्या-47 हजार 272.  या पंचनाम्यासाठी एकूण 20 पथके नेमण्यात आली होती.

मुंबई विभागातून ठाणे/पालघर व देवनार येथून मनुष्यबळ प्राप्त करून देण्यात आले. तर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून देखील 02 प्राध्यापक व  25 पदव्युत्तर विद्यार्थी महाड येथे कार्यरत  आहेत. सद्य:स्थितीत एकूण 20  पथके कार्यरत आहेत. या कालावधीत व जनावरांवर उपचार करणे, लसीकरणाचे कामकाज करणे, दरड कोसळेल्या ठिकाणाहून जनावरांना मातीच्या ढिगाऱ्याखालून काढणे, त्यामध्ये मृत झालेल्या जनावरांची योग्य ती विल्हेवाट लावणे, जखमी झालेल्या जनावरांवर औषधोपचार करण्याचे कामकाज या पथकांकडून करण्यात येत आहे.

संबंधीत पथकांकडून जवळपास 2 हजार 200 जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. महाड शहरामध्ये ए.एम.टी.एम या स्वयंसेवी संस्थेमार्फत 2 हजार कुत्र्यांना मोफत रेबिज आणि शवनिवन लसीकरण करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे त्याच स्वयंसेवी संस्थेमार्फत जवळपास 1 हजार 500 किलो पेडीग्री व इतर नामांकित कंपन्यांचे कुत्र्यांसाठीचे खाद्य वाटपाचे नियोजनदेखील दि. 31 जुलै 2021 रोजी करण्यात आले होते.

या कालावधीत अतिवृष्टीने बाधीत झालेल्या एकूण 44 गावांमधील जनावरांना घटसर्प, फऱ्या व आंत्रविषार व लम्पी त्वचारोगाचे गोट पॉक्स लसीकरणाचे कामदेखील करण्यात आले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पशुवधगृह देवनार येथील 02 अधिकारी व 23 कर्मचाऱ्यांच्या पथकाने अहोरात्र परिश्रम करून मृत जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के,जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ.बंकट आर्ले यांनी दिली आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक