प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहर 2022-23 करिता प्रस्ताव द्यावेत

 

अलिबाग,दि.13 (जिमाका):- शासनाने आंबा व काजू पिकांसाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे. रायगड जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनी लि.मुंबई ही कंपनी नेमलेली आहे. या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमासंरक्षण मिळते. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित पिकांसाठी (आंबा व काजू) योजना ऐच्छिक आहे.

या योजनेंतर्गत पुढील जोखमीच्या बाबींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस नमूद कालावधीपर्यंत विमा संरक्षण दिले जाईल. काजू पिकासाठी अवेळी पाऊस दि.1 डिसेंबर ते दि.28 फेब्रुवारी, कमी तापमान दि.01 डिसेंबर ते दि.28 फेब्रुवारी, विमा संरक्षित रक्कम रु.01 लाख, गारपीट दि.01 जानेवारी ते दि.30 एप्रिल, विमा संरक्षित रक्कम 33 हजार 333.

आंबा पिकासाठी अवेळी पाऊस दि.1 डिसेंबर ते दि.15 मे, कमी तापमान दि.1 जानेवारी ते दि.10 मार्च, जास्त तापमान दि.1 मार्च ते दि.15 मे, वेगाचा वारा दि.10 एप्रिल ते दि.15 मे विमा संरक्षित रक्कम रु.01 लाख 40 हजार, गारपीट दि.1 फेब्रुवारी ते दि.31 मे विमा संरक्षित रक्कम रु.46 हजार 667.

आंबा फळपिकाकरिता प्रति हे.रक्कम रुपये 29 हजार 400, व काजू फळपिकाकरिता प्रति हे.रक्कम रु.5 हजार, इतका विमा हप्ता आहे. गारपीट या हवामान धोक्यापासून विमा संरक्षणासाठी अतिरिक्त विमा हप्ता आंबा फळपिका करिता रक्कम रु.2 हजार 333 व काजू फळपिका करिता रक्कम रुपये 1 हजार 667 प्रति.हे.आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यावर्षी योजनेत सहभागी व्हावे.

सन 2021-22 मध्ये जिल्ह्यात एकूण 5 हजार 661 इतक्या शेतकऱ्यांनी 70.86 लाख रुपये इतका विमा हप्ता भरुन 2469.89 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला होता. त्यामध्ये सर्व विमाधारक 5 हजार 661 शेतकऱ्यांना रक्कम रुपये 22.26 कोटी इतकी विमा भरपाई रक्कम मिळाली आहे.

विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक, सी.एस.सी. सेंटर किंवा पिक विमा पोर्टल https://pmfby.gov.in येथे सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. आंबा व काजू पिकाकरिता विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत दि.30 नोव्हेंबर 2022 निश्चित केलेली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक