जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांनी रोजगार मेळाव्याकरिता रिक्त पदांची माहिती वेबपोर्टलवर सादर करावी

 

अलिबाग,दि.10 (जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथे बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याकरिता जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी आपल्या आस्थापनेकडे भरावयाची रिक्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर भरावीत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी केले आहे.

ही माहिती भरताना प्रथम या वेबपोर्टलवरील Employment Employer (List a Job) Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरून आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्हयाच्या नावावरील View Details Job Details Agree and Post Vacancy-Add New Vacancy ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर रिक्त पदांची माहिती भरुन शेवटच्या पानावरील Save Vacancy वर क्लिक करावे, या पध्दतीने माहिती भरुन रोजगार मेळाव्याच्या नमूद दिनांकास व ठिकाणी उमेदवारांची निवड करुन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी. त्याचप्रमाणे ज्या आस्थापनांची यापूर्वी वेबपोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली नाही त्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Employment Employer (List a Job) Register या क्रमाने जाऊन नवीन नोंदणी करावी व आपल्याकडील रिक्त पदे त्याप्रमाणे वेबपोर्टलवर भरावीत. नवीन नोंदणी करताना उपरोक्त वेबपोर्टलवरील Employment Employer (List a Job) Register या ऑप्शन्सचा वापर करून आपल्या आस्थापनेची नोंदणी करावी. नवीन नोंदणी करताना आपले व्यवसाय सुरु करण्याबाबतचे प्रमाणपत्र (Incorporation Certificate) नोंदणीमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. आपल्या आस्थापनेची नवीन नोंदणी केल्यानंतर आपल्याकडील रिक्त पदे वेबपोर्टलवर अधिसूचित करून रोजगार मेळाव्यातील कार्यवाही करावी.

वेबपोर्टलवर नवीन नोंदणी करणे व पदे अधिसूचित करणे या कार्यवाहीसंदर्भात काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा श्री. सं.अ. वर्तक, यांच्याशी 7276686535 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक