उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा


अलिबाग,दि.12 (जिमाका):- राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत हे बुधवार, दि.12 ऑक्टोबर व गुरुवार, दि.13 ऑक्टोबर 2022 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:

बुधवार, दि.12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता सुदर्शन केमिकल्स, रोहा विश्रामगृह येथे आगमन व राखीव (स्थळ- सुदर्शन केमिकल्स, रोहा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्र, रोहा, जि.रायगड). सोयीनुसार रोहा येथून मोटारीने अलिबागकडे प्रयाण. रात्री सोयीनुसार तुषार शासकीय विश्रामगृह, अलिबाग, रायगड येथे आगमन व राखीव.

गुरुवार, दि.13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन व विकास समिती रायगड बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 वाजता रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे डोंगरी विकास समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद. दुपारी 2:30 ते 3 राखीव. दुपारी 3:15 वाजता जिल्हा नियोजन समिती रायगड, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत हिराकोट तलाव येथे रिटनिंग वॉलचे बांधकाम करणे, रेलिंग बसविणे तसेच उद्यान विकसित करणे या कामाचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- हिराकोट तलाव, जिल्हाधिकारी कार्यालय समोर, रायगड-अलिबाग). दुपारी 3:30 वाजता अलिबाग येथून मोटारीने चिपळूण, जि.रत्नागिरी कडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक