तेनझिंग नॉर्गे राष्‍ट्रीय साहसी पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन



रायगड दि.26:- केंद्र शासनाच्‍या युवक कल्‍याण योजनेअंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्‍ट्रीय साहसी पुरस्‍कार सन २०१८ साठी नामांकनाचे प्रस्‍ताव मागविण्यात येत आहेत. प्रस्‍ताव सादर करणा-या खेळाडूंची खालील नमुद केलेली कामगिरी व कागदपत्रे पेपर कात्रणे  त्‍याबाबत आवश्‍यक ती सर्व माहीती पुढीलप्रमाणे.-1. खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षामधील  म्‍हणजे 20162017  2018  मधील असणे आवश्‍यक आहे. ,2.साहसी उपक्रम हे जमिनीवरील, समुद्रातील किंवा हवेमधील असणे आवश्‍यक आहे.,3.खेळाडूंची कामगिरी अतिउत्‍कृष्‍ट असणे आवश्‍यक असून, त्‍याबाबतची माहिती दोन ते तीन पानांमध्‍ये हिंदी किंवा इंग्रजी या भाषेमध्‍ये देणे गरजेचे आहे. (सदर साहसी पुरस्‍कार हे केंद्र शासनाच्‍या युवक कल्याण योजनेअंतर्गत येत असल्‍याने हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्‍ये आवश्‍यक)
      तरी याबाबत अधिक माहितीसाठी केंद्रशासनाच्‍या युवक कल्‍याण विभागाच्‍या www.yas.nic.in या    संकेतस्‍थळावर पहावे किंवा जिल्‍हा क्रीडा अधिकारी, रायगड यांचे कार्यालयाशी प्रत्‍यक्ष अथवा क्रीडा अधिकारी सचिन निकम यांचेशी मो8856093608 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक