राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा-2017-18किक बॉक्सींग:खेळातून मिळते आयुष्य जगण्याची शिकवण-जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी:राज्यभरातील 500 हून अधिक खेळाडू सहभागी




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27-  आयुष्यात खेळांचं खुप महत्त्व आहे. खेळांमुळे आपल्याला ताण तणावाचं व्यवस्थापन करण्याचे शिक्षण मिळते. शारिरीक बल, निर्णय क्षमता या गोष्टी आत्मसात करतांना खेळ आपल्याला आयुष्य जगण्याची शिकवण देत असतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा  युवक सेवा संचालनालयाच्या  वतिने  राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०१७-१८ अंतर्गत  ‘किक बॉक्सिंग’ स्पर्धाचे आयोजन  जिल्हा क्रीडा परिषद, रायगड लिबाग च्या वतिने दि. २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली, अलिबाग येथे करण्यात आले आहे.  या स्पर्धांचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा उपसंचालक, एन. बी. मोटे  हे  अध्यक्षस्थानी  उपस्थित होते. तसेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते नथुराम पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी  महादेव  कसगावडे, किक बॉक्सिंग संघटनेचे मंदार पनवेलकर, प्रविण पाटील, संतोष म्हात्रे,  प्रदीप शिंदे, संतोष खंदारे  आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्पर्धेचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय  सुवर्णपदक विजेती खेळाडू ऋतूजा माने हिने स्पर्धेतील खेळाडूंना शपथ दिली. क्रीडा अधिकारी घनश्याम राठी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 या स्पर्धांमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद,नागपूर,नाशिक, लातुर, मुंबई, पुणे, कोल्हापूर   शिवछत्रपती क्रीडापीठ अशा एकुण  विभागातून 500 खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत. 
आजच्या स्पर्धांचे निकाल-
14 वर्षाखालील मुले
24 किलो खालील-
1) शिव काळे ,नाशिक
2) साहिद शेख ,कोल्हापुर
3) अबुझर खादर सय्यद, लातूर व आर्यन सोनवणे, मुंबई
28 किलो खालील-
1) दर्शन तांबोळेकर, पुणे
2) मयुर महाजन, णाशिक
3) संताशे नरेंद्र, औरंगाबाद व जाफर शेख, लातूर.
32 किलो खालील-
1) तेजस गोडसे, अमरावती
2) आशिष जैन, नाशिक
3)चेतन इटनकर, नागपूर व सुजल लोणकर, पुणे.
37 किलो खालील-
1) सुहास पोळ, पुणे
2) ओम झडपे, औरंगाबाद
3) अनुराग मिश्रा, मुंबई व संतोष शिंदे, लातूर.
42 किलो खालील-
1) ऋतूराज  गुळूंजकर, पुणे
2) सिद्धार्थ बेहेळकर, नाशिक
3) प्रथमेश पाटील, लातूर व  रितेश गोवारी, मुंबई.
52 किलो खालील-
1) प्रवीण वाघ, पुणे.
2) साहिल गायकवाड, मुंबई.
3) सनी सिंग, नाशिक व सुशांत राठोड, औरंगाबाद.


०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक