नवीन पनवेल येथे आज रोजगार मेळावा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल व रोटरी क्ल्ब ऑफ पनवेल-MIDTOWN यांच्या संयुक्त विद्यमाने   शनिवार दिनांक 28 रोजी सकाळी दहा वाजता के.आ.बांठीया माध्यमिक विद्यालय,सेक्टर-18,नवीन पनवेल, पनवेल रेल्वे स्टेशन जवळ,ता.पनवेल जि.रायगड  येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
            यासंदर्भात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल कार्यालयामार्फत माहिती देण्यात आली की, या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. त्यांना 10वी, 12वी, पदवी, पदवीधर, आयटीआय, सी.एन.सी प्रोग्रॅमिंग, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रीशिअन,डिप्लोमा इन प्रिंटींग अँड पॅकेजिंग,एम.एस.सी.केमिस्ट्री OR पॉलिमर केमेस्ट्री (5 ते 7 वर्षाच्या अनुभवासह ) अशा उमेदवारांची आवश्यकता आहे.
या मेळाव्यात मुलाखतीस येतांना  उमेदवाराने स्वत:चा बायोडाटा, दोन फोटो, सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्याच्या छायांकित प्रतीसह के.आ.बांठीया माध्यमिक विद्यालय,सेक्टर-18,नवीन पनवेल, पनवेल रेल्वे स्टेशन जवळ,ता.पनवेल जि.रायगड येथे  उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या विभागाच्या https://rojgar.mahaswyam.in या वेबपोर्टलवर भेट देवून नोंदणी व अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे. यापूर्वी महारोजगार या वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास सुधारीत संकेतस्थळावर आपला जुना 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे. आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करुन  जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन ROJGAR MELAVA NEW PANVEL या ऑप्शनमध्ये जावून पात्रतेप्रमाणे ॲप्लाय करावे. यामध्ये काही अडचण आल्यास किंवा सहाय्यासाठी हेल्पलाईन 18602330133 किंवा संकेतस्थळ मुखपृष्ठावरील उजव्या खालील बाजूस उपलब्ध असलेल्या Rojgar Chat Helpline या सुविधेचा उपयोग करावा. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी पनवेल यांनी केले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक