नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मौजे ऊसर येथील जागा हस्तांतरित नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरेंचा जबरदस्त पाठपुरावा

 


 

अलिबाग,जि.रायगड, दि.15 (जिमाका) :- महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या दि.31 जानेवारी 2012  च्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या व  भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून अलिबाग येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली होती.

            त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील मौजे ऊसर येथील सर्व्हे नं.75/1अ, क्षेत्र 17-10-14 हे.आर. मधील अनुक्रमे 6-00-00 हे.आर. व 3-50-00 हे.आर. या सरकारी गुरचरण, ग्रुप ग्रामपंचायत खानाव यांच्या नावे असलेल्या जमिनी पुनर्ग्रहित करुन संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता प्रदान करण्यात आलेल्या आहेत. 

             तसेच मौजे ऊसर  येथील सर्व्हे नं.75/1क, क्षेत्र 07-50-40 हे.आर.मधील 4-00-44 हे.आर. या महाराष्ट्र शासन, औद्योगिक विकास महामंडळाचे नावे असलेल्या जमिनीही शासनजमा करुन संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग यांना प्रदान करण्यात आल्या आहेत.

            पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या जबरदस्त पाठपुराव्यामुळे अलिबाग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या कार्यवाहीस चांगलीच गती प्राप्त झाली आहे. यामुळे बराच काळ प्रतिक्षेत असलेले नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होईल.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक