लोकशाही दिनात 8 अर्ज प्राप्त



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज झालेल्या लोकशाही दिनामध्ये  8  अर्ज प्राप्त झाले आहेत. 
             यामध्ये महसूल विभाग- 4 व मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद-3, अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पेण-1 असे एकूण 8 अर्ज प्राप्त झाले आहेत.  त्याची मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांचे 2 अर्ज जागीच निकाली काढण्यात आले.
मागील प्रलंबित अर्ज 6  आणि आजचे 6 असे एकूण 12 अर्ज प्रलंबित आहेत.  यात महसूल विभाग-8, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद-1, मुख्य नियंत्रक अनाधिकृत बांधकाम (सिडको)-2,  अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पेण-1.   यावेळी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीधर बोधे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती जयमाला मुरुडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकरी (सा.प्र.) जि.प.रायगड प्रकाश खोपकर विविध शासकीय विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक