जिल्हा रुग्णालयामार्फत एचआयव्ही जनजागृती


        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6- जागतिक एड्स नियंत्रण दिन (1 डिसेंबर)  व पंधरवाड्यानिमित्त जेएसडब्ल्यु कंपनी लेबर कॉलनी, डोलवी, ता. पेण, जि.रायगड येथे एचआयव्ही एड्स जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
जेएसडब्ल्यु येथील लेबर कॉलनी येथे उदघाटन व  डिजिटल मोबाईल आयसीटीसी व्हॅनचे अनावरण करून  कंपनीच्या विविध विभागामध्ये मोबाईल आयसीटीसी व्हॅन फिरवून  एकूण 6000 लोकांपर्यंत पोहोचून  जनजागृती करण्यात आली.  इच्छुक 721 व्यक्तींचे एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करण्यात  आली. तसेच त्यांची सिफिलिस (गुप्तरोग) विषयी तपासणी करण्यात आली. सांगता समारंभामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून  जनजागृती करण्यात आली. रिता  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी व अध्यक्ष   गजराज राठोड, जे.एस.डब्लू. स्टिल प्रा. लि. डोलवी, ता. पेण , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  संजय माने,  सीएसआर विभाग प्रमुख  राजेश  नैनकवाल तसेच सीएसआर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 
सीएसआर प्रमुख  राजेश  नैनकवाल यांनी यापुढे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग - रायगड यांच्या सोबत पुढील पाच वर्ष काम करण्यात येणार असून उर्वरित सर्व अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी असेही सांगितले. याकरिता आवश्यक असणारे सर्व सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. 
 जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी यापुढे डापकु विभागामार्फत एचआयव्ही एड्स विषयी समुपदेशन व तपासणी करिता विविध प्रकारचे नियोजन करण्यात येईल तसेच 30 वर्षानंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता रक्तदाब, मधुमेह, मानसिक व मौखिक आरोग्य तपासणीकरिता शिबिराचे आयोजन करून त्यामध्ये विविध आजारांचे निदान झालेल्या व्यक्तींना यापुढील उपचार करता येईल, असे सांगितले. डापकु विभागामार्फत एम्पलॉय लीड मॉडेल (ELM) सुरु करून एचआयव्ही एड्स विषयी समुपदेशन व तपासणी आईसी प्रदर्शन व वाटप, कंडोम प्रमोशन व वितरण, गुप्तरोग तपासणी व उपचार अशा विविध घटकांच्यावर काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. 
दि रुरल अँड यंग फाऊंडेशन, पेण, जि.रायगड यांचे मार्फत  डोलवी येथे आर्केस्ट्रा घेण्यात आला. सदर आर्केस्ट्रा करीता 1200 ते 1500 कामगार  उपस्थित होते.  आर्केस्ट्राच्या  दरम्यान  एचआयव्ही  एड्स व गुप्तरोग यांची करणे, लक्षणे, समज गैरसमज तसेच शास्त्रीय माहिती देऊन इच्छुक असणाऱ्या व्यक्तींचे  एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करण्यात आली. 
श्रीम. संहिता चटर्जी यांची सांगता समारंभ कार्यक्रमाची प्रस्तावना करून अध्यक्ष  गजराज राठोड, जे.एस.डब्लू. स्टिल प्रा. लि. डोलवी, ता. पेण,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  संजय माने,  सीएसआर विभाग व डापकु विभाग यांनी  सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केलेबद्दल विशेष आभार व्यक्त केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता जे.एस.डब्लू. सीएसआर विभागातील श्रीम. संहिता चटर्जी,  विजय कांबळे, किरण म्हात्रे  व इतर अधिकारी व कर्मचारी तसेच डापकुमधील   जिल्हा सहाय्यक लेखा  रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम.अँड ई. सौ. रश्मी सुंकले,  आयसीटीसी विभागातील  समुपदेशक  सचिन जाधव, अमोल नारखेडे,  प्रयोगशाळा तंत्रज्ञ  गणेश सुतार,  सीता जाधव, मंगेश पाटील, एसटीडी विभागातील समुपदेशक  प्रतिम सुतार, मोबाईल आयसीटीसी व्हॅन वाहनचालक किरण पाटील, क्लिनर रुपेश पाटील यांनी विषेश सहकार्य केले.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक