जागतिक मृदा दिवस :राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वितरण :आंबेपूर येथे आज कार्यक्रम




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जिल्ह्यात माती नमुने गोळा करुन त्यांची तपासणी करण्यात आली आहे. जागतिक मृदा दिनानिमित्त मंगळवार दि. 5 रोजी आंबेपूर येथे जमीन आरोग्य पत्रिका वितरणाचा शुभारंभ केला जाणार आहे. असे जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी रायगड यांनी कळविले आहे. सकाळी 11 वाजता आमदार सुभाष ऊर्फ पंडितशेट पाटील यांच्या हस्ते जमीन आरोग्य पत्रिका वितरण होणार आहे.
रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत सन 2017-18 मध्ये जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रमा अंतग्रत शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका देण्याकरीता जिल्ह्यातील 978 गावांतून 16500 माती नमुने गोळा करण्यात आले आहेत. त्यामध्ये 163264 शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारीत अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे, जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस राज्यात साजरा करण्यात येणार आहे. त्याचे औचित्यसाधून रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वितरण शुभारंभ व मार्गदर्शनाचा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात घेण्याचे आयोजित केले आहे. मंगळवार दि. 5 डिसेंबर रोजी आंबेपूर ता.अलिबाग  येथे सकाळी 11 वाजता आमदार सुभाष ऊर्फ पंडितशेट पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जमीन आरोग्य पत्रिका वितरण करण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक