सशस्त्र सेना ध्वजदिन -2017 :निधी संकलन शुभारंभ 8 रोजी
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7:- सशस्त्र सेना ध्व्जदिन -2017 निधी संकलन शुभारंभ सोहळा शुक्रवार दि.8 रोजी
सकाळी साडे दहा वाजता राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.विजय सुर्यवंशी
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी
संकलन समिती रायगड यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांच्या प्रमुख
उपस्थितीत होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे व जिल्हा सैनिक
कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ प्र.जाधव (नि.) यांनी कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment