“हॅम रेडिओ” चा वापर आपत्ती काळात योग्यच - तहसिलदार मीनल दळवी

 

अलिबाग, दि.20 (जिमाका):- आपत्ती काळात मोबाईल यंत्रणा बंद पडल्यास हॅम रेडिओचा वापर करून तातडीने आपत्ती व्यवस्थापन करता येऊ शकते. त्यासोबत आपण वित्तहानी, मनुष्यहानी, आग, अपघातही हॅम रेडिओचा वापर केल्याने टाळू शकतो, असे अलिबाग तहसिलदार मीनल दळवी म्हणाल्या.

अलिबाग तहसील कार्यालय येथे रायगडचा युवक फाउंडेशनतर्फे हॅम रेडिओच्या वापराबाबत आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील यांनी प्रात्यशिक आयोजित केले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी नायब तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अजित टोळकर, सोबत हॅम रेडिओ परवानाधारक रायगडचा युवक फाऊंडेशनचे खजिनदार सत्यम पाटील, आपत्ती व सुरक्षा मित्र मंगेश राऊत, प्रथमेश भगत हे अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरून तहसिलदार मीनल दळवी व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील यांच्यासोबत अलिबाग तहसील कार्यालय येथे संवाद साधत होते. तर आपत्ती व सुरक्षा मित्र तथा हॅम परवानाधारक दिलीप बापट हे हॅम रेडिओ कंट्रोल चेंढरे मधून देत होते. यावेळी मॉकड्रील करताना तहसिलदार मीनल दळवी यांनी वायरमन यांना आदेश देताच जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारा सुरक्षितपणे काढण्यात आल्या.

या प्रशिक्षण कार्यक्रमास नायब तहसिलदार राजेश नागे, श्रीमती नम्रता भोयर, रायगडचा युवक फाऊंडेशनचे आपत्ती व सुरक्षा मित्र अश्रफ घट्टे, पूजा पेडणेकर सुरेश खडपे, पत्रकार कवठेकर, महेश शेरमकर कार्यालय कर्मचारी व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक