मुद्रा कार्ड योजना अधिक लाभधारकांपर्यंत पोहोचवा -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

दिनांक :- 8 मार्च 2017                                                                   वृत्त क्र.124
मुद्रा कार्ड योजना
अधिक लाभधारकांपर्यंत पोहोचवा
                          -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले  
                     
अलिबाग दि. 8 (जिमाका):- स्वत:चा व्यवसाय, उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्या अधिकाधिक होतकरु उद्योजकांपर्यंत   मुद्रा बँक योजनेची माहिती पोहोचविण्यासाठी प्रसार व प्रसिध्दी समन्वय समितीने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्षा मुद्रा बँक समन्वय समिती श्रीमती शीतल तेली-उगले यांनी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या मुद्रा बँक समन्वय समितीची बैठकीत मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या बैठकीस रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अशोक नंदनवार, समिती सदस्य-सरकारी वकील ऍ़ड प्रसाद पाटील,  जिल्हा नियोजन अधिकारी तथा समिती समन्वयक सुनिल जाधव, समिती सदस्य जिल्हा उद्योग केंद्राचे बी.आर.पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्र.अ. आर.पी.बघे,   बी.एस.पोळ तसेच  सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, आदी सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, मुद्रा योजनेला व्यापक प्रमाणात प्रसिध्दी देण्यासाठी आय.टी.आय.,महिला बचत गट, एन.एस.एस. विद्याथी यांचे स्वतंत्र मेळावे आयोजित करावे त्यामुळे उद्योग करण्यास उत्सुक असणाऱ्या घटकांना याची माहिती होऊन ते योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येतील.समितीने प्रसिध्दीच्या विविध पर्यायांचा उपयोग करावा. तसेच जिल्हयातील प्रगतीचा त्रैमासिक अहवाल शासनाकडे पाठवावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
मुद्रा बँक योजनेची प्रसिध्दी  , पथनाटय, जिंगल्स, सिनेमागृहात स्लाईड, एस.टी.बस पॅनल, लघुपट, चित्ररथ,  पुस्तीका, घडी पत्रिका आदी प्रसार  माध्यमाचा उपयोग प्रसिध्दीसाठी करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांनी दिली.
                                                00000000

  

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक