रायगडची दंगल क्वीन कुस्ती पट्टू समिक्षा कटोर

दिनांक :- 6 मार्च 2017                                                          लेख क्र.09
रायगडची दंगल क्वीन
कुस्ती पट्टू समिक्षा कटोर
         

              कुस्ती हा खेळ  पुरुषांचा समजला जाणारा असला तरी रायगड जिल्ह्यातील समिक्षा किसन कटोर या मुलींने या कुस्ती क्षेत्रात आपली हुकूमत गाजवली आहे.  राष्ट्रीय पुरस्कार मिळवून रायगड जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  तिच्या कुस्तीच्या कामगिरीकडे टाकलेला एक दृष्टीक्षेप…

दंगल चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.  यात महिला कुस्तीपट्टूवर एक वेगळा  प्रकाश  टाकण्यात आला.  महिला कुस्तीपट्टू संदर्भात जनसामान्यात चर्चा सुरु झाली.  हे जरी या चित्रपटाने  घडले असले तरी यापूर्वीपासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील नवेदर-नवगावची युवा कुस्तीपट्टू समिक्षा किसन कटोर कुस्ती क्षेत्रात आपल्या कामगिरीने अनेकांच लक्ष वेधून घेत होती. 
 समिक्षाचे वडील किसन कटोर हे कुस्तीपट्टू. वडीलांची कुस्तीमधील कामगिरी बघून समिक्षाला सुध्दा कुस्ती खेळाची प्रेरणा मिळाली. मुलीची आवड लक्षात घेता त्यांनीही तिच्याकडून कठोर परिश्रम, कडी मेहनत, व्यायाम करवून तिला घडविण्याचे काम केले.  मुलींना कुस्ती क्षेत्रात पाठविणे हे प्रवाहाविरुध्द असणारे काम.  पण किसन कटोर यांनी ते मोठ्या हिकमतीने  केले.  तसेच मुलींच्या शिक्षणाकडेही  त्यांनी लक्ष दिले.  समिक्षाचे प्राथमिक शिक्षण अलिबाग येथील आर.सी.एफ. शाळेमध्ये झाले आहे.  तसेच तिने बी.ए., बी.पी.एड.केले असून सध्या ती पुण्यात एम.पी.एड शिकत आहे. 
यशस्वी कामगिरी
समिक्षा कुस्तीक्षेत्रात तालुका, जिल्हास्तरावर खेळू लागली. तिच्या खेळातील चमक दिसू लागली.     पुढे ती राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळू लागली.  जपान ऑलिपिंक नंतर मुलींची रेसलिंग सुरु झाली. हे करत असताना तिने आंतरराष्ट्रीय नियमानुसार आपल्यात बदल अंगीकारला.  कॉमनवेल्थसाठी केंद्र शासनामार्फत  पटीयाला येथे तिने शिक्षण पूर्ण केले.   तिला खाशाबा जाधव चषक सन 2013 व 2014 साठी  पहिले पारितोषिक मिळाले आहे.  तर पंधरावा महिला राज्य कुस्ती चँम्पियन स्पर्धेसाठीचे दुसरे पारितोषक मिळविले. तर सन 2014 च्या यास्पर्धेत पहिले पारितोषिक मिळविले.   तसेच तिला रायगड जिल्हा स्पोर्टस ॲवार्ड वेस्ट झोन ऑल इंडियन स्टाईल कुस्ती चॅम्पियन शीप पहिले पारितोषिक मिळाले.
समिक्षाच्या क्रीडा कारर्किर्दीच्या यशात वडिल किसन कटोर व आई लता कटोर यांचे कठोर परिश्रम आहेत.  तसेच भाऊ पार्थ याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.  तर समिक्षाच्या बहिणी तनुजा, गिताई, संपदा याही कुस्तीक्षेत्रात  कामगिरी करत आहेत. 
00000
                                                  विष्णू काकडे
                                                        माहिती अधिकारी

                                                                                          जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक