जिल्हयात महिला दिन उत्साहात महिला मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम

दिनांक :- 08/03/2017                                                                                                    वृ.क्र 125                                                                             
जिल्हयात महिला दिन उत्साहात
महिला मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम

          अलिबाग दि.08 (जिमाका), जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने संपूर्ण जिल्हयात महिला मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी सर्व उपस्थितांना महिलांचा सन्मान व आदर करण्याबाबत शपथ दिली.
            यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,  जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रसाद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जेष्ठ विधीज्ञ ॲड.प्रविण ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर व इतर मान्यवर उपस्थित होते.  
शपथ

मी घरात, कार्यालयात, समाजात आपल्या आजूबाजूच्या परिसरात मुलां-मुलींमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही, मुली व महिलांवर कोणत्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक अत्याचार होत असल्यास त्याचा विरोध करीन, मुली व महिलांच्या प्रतिष्ठेस हानी पोहचेल असे कोणतेही कृत्य करणार नाही. त्यांच्या हक्कांचा व प्रतिष्ठेचा आदर ठेवीन.
तसेच महिला दिनाचे महत्व लक्षात घेता राज्यातील महिला मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश मा.निवडणूक आयोगाकडून आलेले आहे. त्या अनुषंगाने जिल्हयातही सर्वत्र वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत महिलांना मतदार ओळखपत्र वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.   यावेळी श्रीमती शाहीन हसलानी, श्रीमती पुष्पा उल्हास बंदरी, श्रीमती पुजा नागेश पोतदार या महिला मतदारांना प्रातिनिधिक स्वरुपात  मतदार ओळखपत्राचे  वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. 
सर्वत्र  विविध कार्यक्रम

म्हसळा तालुक्यात तहसिलदार विरसिंग वसावे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिला मतदारांना मार्गदर्शन व निवडणूक ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला निवडणूक नायब तहसिलदार रावसाहेब मोरे, निवासी नायब तहसिलदार भिंगारे तसेच महिला कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
पेण तालुक्यातही तहसिलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध भागातील 50 महिलांना मतदार यादीत नाव समाविष्ठ करण्याबाबतचे अर्ज देऊन ते भरुन घेतले. तसेच काही महिला मतदारांना प्रातिनिधिक स्वरुपात मतदार ओळखपत्र वाटप केले. महिला मतदारांना मतदार नोंदणी विषयची माहिती देण्यात आली तर पेण पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरीक्षकांनी महिलांच्या हक्का विषयी माहिती देऊन जनजागृती केली. यावेळी सहाय्यक निबंधक श्रीमती वारे व इतर महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.
सुधागड-पाली  युवा महिला मतदार वर्गाला प्राधान्य देत सुधागड-पाली तालुक्यात मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तहसिलदार बी.एन.निंबाळकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात ओळखपत्र देऊन महिला दिन साजरा करण्यात आला.
कर्जत तालुक्यात महिला दिना निमित्त्‍ घेतलेल्या महिला मतदार  नोंदणी कार्यक्रमांतर्गत पाच  महिलांना प्रातिनिधीक स्वरुपात मतदार ओळखपत्रांचे वाटप करुन तसेच महिलांच्या हक्का विषयक माहिती देवून महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी तहसिलदार अविनाश कोष्टी  तसेच कार्यालयातील महिला कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
            खालापूर तालुक्यात 150 महिलांना आपल्या राज्यघटनेच्या उददेशिकेच्या प्रतींचे वाटप करुन तहसिलदार राजेंद्र चव्हाण यांनी महिला दिन व महिला मतदार साक्षरता मोहिम आगळया वेगळया उपक्रमाने साजरी केली.यावेळी उपविभागीय अधिकारी  दत्ता भडकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

                                                                        00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक