महा आधार सीडींग मेळावा 16 मार्च रोजी जिल्ह्यात आयोजन

वृत्त्‍ क्र.121                                                                           दिनांक :- 7 मार्च 2017
महा आधार सीडींग मेळावा
16 मार्च रोजी जिल्ह्यात आयोजन

बँक खाते आधारकार्डशी सलग्न करणार
                                                          ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले
अलिबाग (जिमाका)दि.7:- जिल्ह्यातील बँकामधील सर्व खाती आधारकार्डशी सलग्न (सीडींग) करण्यासाठी जिल्ह्यातील अग्रणी बँक आणि इतर बँकांनी  गुरुवार दि. 16 मार्च 2017 रोजी महा आधार सीडींग मेळाव्याचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले.
          या बैठकीस रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर,निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अशोक नंदनवार, नोडल अधिकारी अजय सावंत तसेच जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी   उपस्थित होते.
          शासनाच्या निर्देशानुसार शासकीय योजना व सवलतींचा लाभ आधारकार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे बँकांमधील असलेली बचत खाते शंभर टक्के आधार कार्डशी सलग्न (सीडींग) करण्याचे नियोजन आहे. यासाठी महा आधार सीडींग मेळाव्याचे आयोजन 16 मार्च 2017 रोजी जिल्ह्यातील बँकांनी आपल्या शाखेच्या जवळ आयोजित करावे. नागरिकांनीही आपल्या जवळच्या बँक शाखेच्या परिसरात आयोजीत केलेल्या आधार सीडींग मेळाव्यास उपस्थित राहून आपल्या आधारकार्ड नंबरशी बँक खाते सलग्न करावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक