स्वच्छ शक्ती सप्ताहा निमित्त जागतिक महिला दिनी महिला सरपंचांचा सन्मान

वृत्त क्र.123                                                                         दिनांक :- 7 मार्च 2017
स्वच्छ शक्ती सप्ताहा निमित्त
जागतिक महिला दिनी महिला सरपंचांचा सन्मान

          अलिबाग दि.07 (जिमाका) स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने घर तेथे शौचालय या उपक्रमाद्वारे हागणदारीमुक्त गाव मोहिमेला प्राधान्य दिले आहे. स्वच्छता मोहिमेत उत्कृष्ट काम केलेल्या महिला सरपंचांना केंद्र शासनाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुजरात, गांधीनगर येथे महिला मेळावाकरीता निमंत्रित केले आहे. स्वच्छतेच्या या गुजरात दौऱ्यांकरीता रायगड जिल्हयातील 31 महिला सरपंच रवाना झाल्या आहेत.
          सदर महिलांना शुभेच्छा देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) पी.एम.साळुंके, पेण चे गट विकास अधिकारी सी.पी.पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, वडखळ ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश पाटील उपस्थित होते.
           यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.साळुंके म्हणाले की, आपले गाव हगणदारी मुक्त होणेसाठी महिला सरपंचांनी दिलेल्या योगदानाची शासनाने दखल घेवून आपली निवड केली आहे. आपण या कार्यक्रमात केलेल्या कामांची माहिती सहभागींना द्यावी व स्वच्छतेच्या कार्यक्रमाची इतर राज्यातील अनुभव दाखले याची माहिती शेअर करावी व आपला तालुका हगणदारीमुक्त करणेस योगदान द्यावे. यावेळी सहभागी महिला सरपंचानी स्वच्छतेस केलेल्या कामाची दखल केंद्र शासनाने घेवून या मेळाव्यास सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हा कक्षातील तज्ञ रविकिरण गायकवाड व नेहा जाधव या महिला समवेत सहभागी झाले आहेत.
          सदर मेळाव्याचा समारोप पंतप्रधनांच्या उपस्थितीमध्ये 8 मार्च 2017 रोजी होणार आहे. या मेळाव्याचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रसारण नॅशनल दुरदर्शन चॅनल वर 8 मार्च, 2017 रोजी दुपारी 3.00 ते 5.00 वा. च्या दरम्यान करण्यात येणार आहे.
          जिल्हयातील सर्व नागरीकांना पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याचे व भाषणाचे थेट प्रसारण पाहण्याचे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सांळुंके यांनी केले आहे. जेणे करुन स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये जिल्हयातील महिलांचा व नागरीकांचा सक्रीय सहभाग मिळून हि चळवळ आणखी बळकट होईल.
000000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक