पॉवर वुमन-ज्योतिका पाटेकर

दिनांक :- 6 मार्च 2017                                                          लेख-क्र.10
 पॉवर वुमन-ज्योतिका पाटेकर

आपल्या आशा आकांक्षा जपत  कर्तव्याच्या ओझ्याखाली न दबता जिद्द, ध्येय व मेहनत यांच्या जोरावर  मुलांची व कुटुंबाची जबाबदारी घेत पॉवर वुमन म्हणून नावारूपास येण्याची किमया ज्योतिका पाटेकर यांनी वयाच्या 48 व्या वर्षी केली आहे.
  26 वर्षाच्या मोठ्या थांब्यानंतरचा ज्योतिका पाटेकरांचा आपल्या लेकी सोबतचा प्रवास रंजक आहे.  मायलेकींची कहाणी आजच्या समस्त महिला वर्गालाच काय पण विशीच्या तरुणींनाही स्फूर्तीदायक  आहे. 

          दंगल या अमिर खानच्या चित्रपटात कुस्ती खेळासाठी व देशाला या खेळात गोल्डमेडल मिळवून देण्यासाठी आपल्या मुलींना घडविण्यास होणारी पालकांची धडपड, तगमग संपूर्ण देशाने पाहिली व स्विकारली.   तर आपल्या चिमुकलीचे भविष्य उज्वल होण्यासाठी पालक वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असल्याच्या अनेक घटना आहेत.  अशा प्रकारच्या या घटनांनाही मागे सारणारी अनोखी किमया रायगडाच्या ज्योतिका पाटेकर या हिरकणीने केली आहे.
शालेय व महाविद्यालयीन जीवनात म्हणजे 1984 ते 1990 मध्ये  उत्कृष्ट पॉवर लिफ्टिंग असणाऱ्या ज्योतिका यांनी लग्नानंतर म्हणजे  तबल 26 वर्षांनी या क्षेत्रात अगदी अनाकलनीय प्रसंगाने पुन्हा पुनरागमन करीत, महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी निर्माण केली आहे.  कोइमतुर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवर स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.  यावर्षी 12 ते 15 जानेवारी 2017 दरम्यान आयोजित राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग फेडरेशनच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.  ज्योतिका यांना  21 ते 23 मार्च 2017 मध्ये जम्मू येथे होणाऱ्या  आंतरराष्ट्रीय स्पर्थेत महाराष्ट्र टीमचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
मुलगी वैभवी  बरोबरच सराव करुन तीन महिन्याच्या सरावातील  कालावधीत   जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत पहिली येण्याचा मान मिळाला.    तर पुढील वाटचाल सुरु असताना मुलीसोबत जळगाव येथील  राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग  स्पर्धेत  63 वजनी गटात 28 स्पर्धकांमध्ये  सुवर्ण पदक तर मुलीचा (वैभवी ) चौथा क्रमांक आला.   यावेळी ज्योतिका यांनी 63 किलो वजनी गटात 217.5  किलोचे वजन उचलले होते.    केरळ मध्ये झालेल्या स्पर्धेत 218 किलो वजन उचलण्याचा मन मिळवला होता.
रायगडातील गोरेगाव सारख्या छोट्याश्या गावात ज्योतिका पाटेकर घरातील आर्थिक स्थिती बेताची असल्याने, हातगाडीवर लोणेरे येथे  सँडवीज व स्नॅक्स विकून आपला संसाराचा रहाटगाडा चालवितात.   पाच मुलांची आई असणाऱ्या ज्योतिका पाटेकर यांच्या दोन मुली नोकरी करतात, दोन कॉलेजला, मुलगा दहावीच्या परीक्षेची तयारी करीत आहे.
00000
                                                  अरुण नलावडे (पत्रकार)
                                             खालापूर

                                                                      मार्फत-जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक