जागतिक महिला दिना निमित्त महिला मतदार साक्षरता दिवस

लेख क्र.12                                                                                          दिनांक :- 7 मार्च 2017
जागतिक महिला दिना निमित्त
 महिला मतदार साक्षरता दिवस
8 मार्च 2017 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्वत्र साजरा होणार आहे. महिला दिनाचे औचित्य साधून या वर्षी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचेकडील निर्देशांप्रमाणे रायगड जिल्हयात सर्व  विभागीय स्तरावर व तालुका स्तरावर  महिला मतदार साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.या विषयाची माहिती देणारा लेख….

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे येत्या 8 मार्च,2017 रोजी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त महिलांना लोकशाही प्रक्रीयेमध्ये  सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी महिलांच्या उन्नतीकरीता काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महिला कल्याण अधिकारी, आरोग्य विभागातील परिचारिका आणि शिक्षिका यांचे तसेच इतर अशासकीय  वा शासकीय संस्था / महामंडळ (माविम सारख्या) यांचे सहकार्य घेऊन हे काम केले जाणार आहे.
            या निमित्त् रायगड जिल्हयातील सर्व पात्र महिला मतदारांना जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड अलिबाग यांचेतर्फे खालीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे. दि.1जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर 18 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र महिला मतदारांनी www.ceo. maharashtra.gov.in या मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळाला भेट देऊन आपले नाव मतदार यादीमध्ये आहे अथवा नाही हे ऑनलाईन पद्धतीने  तपासून घ्यावे. किंवा आपल्या नजीकच्या संबंधित मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय, सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) येथे भेट देऊन आपले मतदार यादीत नाव आहे अथवा नाही हे तपासून घ्यावे.
भारतात प्रत्येक क्षेत्रात महिलाचे सक्रीय योगदान वाढत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही महिलांचे 50 टक्के प्रतिनिधित्व आहे. आपल्या समस्यांविषयी जागरुक राहून तसेच जागरुक लोकप्रतिनिधींची निवडणूक करणे ही काळाची गरज आहे.
            रायगड जिल्ह्यात सन 2011 च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण हे 925 आहे. तसेच दि.5 जानेवारी, 2017  रोजी अंतिम प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण हे 955  आहे. यावरुन रायगड जिल्ह्यातील  मतदार यादीनुसार पुरुष मतदारांमागे स्त्री मतदारांचे प्रमाण समाधानकारक आहे.      
            मतदार यादीत नाव समाविष्ट नसेल तर नाव नोंदणी करणेसाठी नमुना नं.6 भरुन सोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडून नजीकच्या संबंधित मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय  अधिकारी कार्यालय, सहा. मतदार नोंदणी अधिकारी  तथा तहसिलदार कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना नमुना नं. 6 सादर करावा.
            वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला/पेन कार्ड यापैकी कोणतेही एक झेरॉक्स्). रहिवासी पुरावा (वीज बिल,/टेलिफोन बिल/आधार कार्ड/बँकेचे पासबुक इत्यादी यापैकी कोणतेही एक झेरॉक्स )
नमुना नं.6 मध्ये आपल्या नातेवाईकाचे नाव मतदान यादीत असलेबाबतचा तपशील भरुन देणे. त्याचप्रमाणे विवाहीत स्त्रीयांनी आपले माहेरचे नाव मतदार यादीतून वगळणीसाठी संबंधित अधिकारी  अधिकारी तथा तहसिलदार कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांजकडे वगळणीचा नमुना नं.7 भरुन  देण्याचा आहे. दोन ठिकाणी मतदार यादीत नाव असणे हे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 अन्वये गुन्हा आहे याची कृपया नोंद घ्यावी.
मतदान नोंदणी झालेल्या सर्व पात्र महिला मतदारांना 8 मार्च ,2017 रोजी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय, सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार कार्यालय येथे नवीन मतदार ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे. तरी सदर ठिकाणी निश्चित केलेल्या वेळेवर उपस्थित रहावे.
            अधिक माहितीसाठी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02141-224131 वर संपर्क साधावा, तसेच   www.ceo. maharashtra.gov.in  मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळाला भेट देवून मतदान नोंदणीसाठी आवश्यक माहिती उपलब्ध करुन घ्यावी.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक