आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 

 

अलिबाग,दि.22(जिमाका):- दैनंदिन धावपळीच्या कामकाजात आपल्या तब्बेतीची काळजी योग्य रीतीने घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अलिबाग पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 6 वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सर्व स्थानिक कर्मचारीवर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

शरीर व मन यांच्यात दुवा साधणारा मार्ग म्हणजे योग. ज्यामुळे आपल्याला नवचैतन्य प्राप्त होऊ शकते. प्रत्येकाने वेळात वेळ काढून कमीत कमी 10 मिनिटे हा योग साधना केली तरी आपल्या तब्बेतीच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतील, अशी माहिती यावेळी अलिबाग पोस्टमास्टर श्री.गजेंद्र भुसाणे यांनी दिली.

यावेळी मुख्यालयाचे सहायक अधीक्षक श्री.सुनील पवार यांनी आजच्या योगशिबिराच्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीच्या 5 हजार वर्षांच्या परंपरेला स्पर्श करू शकलो, असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी योगासनांच्या विविध प्रकारांबाबत निलेश पाटील, समीर म्हात्रे, मनोज अंबुरे यांनी उपस्थित कर्मचारीवर्गास माहिती दिली.

या कार्यक्रमास सरिता म्हात्रे, मृणाल सावंत, अस्मिता पाटील, प्रभा राऊत या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. डाक अधीक्षक डॉ. संजय लीये हे रजेवर असतानाही त्यांनी या शिबिरात ऑनलाईन सहभाग घेत ऑनलाईन शुभेच्छा दिल्या तर नव्याने रुजू होणारे डाक अधीक्षक श्री.सुनील थळकर यांनीही  उपस्थितांना आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक