मुरुड तालुक्यात विविध दाखले वाटप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 995 हून अधिक नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ

 

अलिबाग,दि.22(जिमाका):- शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे व अलिबाग उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड-जंजिरा तहसिलदार कार्यालयामार्फत  दि.22 जून 2023 रोजी दरबार हॉल, मुरुड येथे शैक्षणिक दाखले, पीएम किसान योजना, ई-केवायसी, आधार सिडींग, रेशन कार्ड देणे असे विविध  प्रकारचे दाखले देण्यासाठी एकदिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मुरुड तालुक्यातील नागरिकांना दुय्यम शिधापत्रिका 475, उत्पन्न दाखले -130, वय व अधिवास दाखले 95, नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती 60, पीएम किसान ई-केवायसी 55, आयुष्यमान भारत कार्ड-48, आधार कार्ड 40, शिधापत्रिकेत नाव दाखल करणे 35, पॅन कार्ड 20, ई-श्रम कार्ड  15, शेतकरी दाखले 12,ई दाखले 10, अशा एकूण 995 दाखल्यांचे वाटप  करण्यात आले.

यावेळी तहसिल कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी, सेतू केंद्राचे कर्मचारी, CSC केंद्राचे कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थित राहून कामकाज सुलभ होण्यासाठी सहकार्य केले. 

तालुका प्रशासनाच्या वतीने मुरुड-जंजिरा तहसिलदार श्री.रोहन शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले व तालुक्यातील शिल्लक असलेल्या सर्व लाभार्थींनी पीएम किसान ई केवायसी करुन घेण्याचे आवाहन केले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक