लाभार्थ्यांनी पी एम किसान योजनेच्या लाभासाठी 23 जूनच्या कॅम्प मध्ये सहभागी व्हावे -- कृषी सहसंचालक श्री.अंकुश माने

 

 

अलिबाग,दि.22 (जिमाका):- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी एम किसान) अंतर्गत 14 व्या हप्त्याचे वितरण जून महिन्यात होत आहे. केंद्र शासनाने योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते आधार संलग्न करणे, eKYC प्रमाणीकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. त्याशिवाय त्यांना योजनेचा पुढील हप्ता अदा होणार नाही. या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांनी पी एम किसान योजनेच्या लाभासाठी 20, 21 व 22 जून रोजी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. अजूनही काही लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, याकरिता दि.23 जून 2023 रोजी देखील विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित लाभार्थ्यांनी यात सहभागी व्हावे,असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक श्री.अंकुश माने यांनी केले आहे.

             राज्यात सद्य:स्थितीत जवळपास 10 लाख व 18 लाख लाभार्थीची अनुक्रमे बँक खाते आधार संलग्न करणे व eKYC करणे प्रलंबित आहे. केंद्र शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे राज्यात दि. 1 मे पासून मा. जिल्हाधिकारी महोदयांच्या नियंत्रणाखाली काम सुरू आहे. मात्र यात फारसे यश येत नसल्याने कृषी आयुक्तांच्या दिनांक 15 जून 2023 रोजी च्या पत्रातील आदेशानुसार संपूर्ण राज्यामध्ये दि.20, 21,22 व 23 जून 2023 रोजी संपूर्णतः पीएम किसानचे काम करण्यासाठी गावोगावी कृषी सहाय्यकांमार्फत सकाळी 8:00 ते सायंकाळी 06:30 वाजेपर्यंत कॅम्पचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. या कॅम्पमध्ये संपूर्ण कृषी विभाग, आत्मा यंत्रणा, पोस्ट खाते, बँका तसेच सामाईक सुविधा (CSC) हे सहभागी होणार आहेत.

             या कॅम्पची पूर्वतयारी कृषी विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू असून कृषी सहाय्यकांना गावे वाटप करण्यात येऊन प्रलंबित लाभार्थ्यांच्या याद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कॅम्पबाबत प्रत्येक गावामध्ये नोटीस लावणे, दवंडी देणे तसेच व्हाट्सअप ग्रुपवर प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. प्रलंबित लाभार्थ्यांनी कॅम्पमध्ये सहभागी होऊन त्यांची eKYC करण्यासाठी कृषी विभागाच्या मदतीने पी एम किसान पोर्टलवरील Farmers corner मधील eKYC- OTP आधारित सुविधेद्वारे अथवा सामायिक सुविधा केंद्र (CSC) च्या मदतीने अथवा पी एम किसानच्या नवीन अँप्पद्वारे Face authentication च्या माध्यमातून ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे. तसेच संबंधित लाभार्थ्याला जर बँक खाते आधार संलग्न करायचे असेल तर कॅम्पवेळी बँकेच्या सहकार्याने बँक खात्यास आधार संलग्न करावा किंवा या कॅम्पवेळी पोस्टमास्तर यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खाते उघडावे व 14व्या हप्त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक श्री. अंकुश माने व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक