मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

 

अलिबाग,दि.22(जिमाका):- सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणारे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह महाड येथे कार्यरत आहे. वसतिगृहाकरिता सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या वसतिगृहात इयत्ता आठवी पासून पुढे शिकणात्या विद्यार्थिनीला गुणवत्तेनुसार व प्रवर्गनिहाय प्रवेश दिला जाईल. शालेय- 30 जागा, इयता 11 वी 12 वी-15 जागा, व वरिष्ठ महाविद्यालय 15 जागा व व्यावसायिक - अभ्यासक्रमाकरिता -15 विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास, भटक्या जमाती इत्यादी संवर्गात इयत्ता आठवी पासून व भंगी, मांग, गौड, कातकरी, माडिया गोंड इत्यादी जमातीमधील विद्यार्थिनींना इयत्ता 5वी पासून विशेष प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.

वसतिगृह प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे :-मागील इयत्तेची मार्कलिस्ट झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला/ बोनाफाईट झेरॉक्स व विद्यार्थिनीचा 1 फोटो, तहसिलदाराकडील उत्पनाच्या दाखल्याची झेरॉक्स (उत्पन्न अट SC,ST. 2 लाख 50 हजार व इतर जातीच्या विद्यार्थींनींना 1 लाख 50 हजार,  SC/ST/VJNT/OBC या प्रवर्गातील विद्यार्थिनींकरिता जातीच्या दाखल्याची झेरॉक्स, आधारकार्डची झेरॉक्स, बँक ऑफ इंडिया चे खाते क्रमांक.

वसतिगृहात मोफत देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा :- प्रतिवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना पुस्तके, शैक्षणिक साहित्य खरेदीकरिता शैक्षणिक साहित्य भत्ता रु.4 हजार,  दररोज दूध- नाष्टा, दोन अंडी/कॉर्नफ्लेक्स, सफरचंद व ऋतुमानानुसार उपलब्ध असणारे 1 फळ, दोन वेळचे जेवण, आठवड्यातून 2 वेळा चिकन/मटण देण्यात येते, बेडशीट, चादर, ब्लॅकेट, सतरंजी, उशीचा अभ्रा, ताट, वाटी, पेला इत्यादी पुरविले जाते, विद्यार्थिनींना शालेय गणवेशाकरिता प्रतिवर्षी रु.1 हजार, महाविद्यालयीन गणवेशाकरिता प्रतिवर्षी रु.2 हजार, प्रतिवर्षी सायन्स शाखेकरिता अॅप्रॉन भत्ता रु.500/-, छत्री व गमबूटकरिता प्रत्येकीस प्रतिवर्षी रु.500/-, प्रतिमहा प्रति विद्यार्थिनीस रु.500/- निर्वाहभता व प्र. साहित्य भत्ता रु. 100/- देण्यात येतो, शैक्षणिक सहल, वार्षिक स्नेहसंमेलन, पालकसभा तसेच विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध उपक्रम राबविले जातात, दैनंदिन योगासन वर्ग व साप्ताहिक समाजसेवा तासिका घेतली जाते, दैनिक वृत्तपत्रे, ग्रंथालय सुविधा, संगणक सुविधा तसेच अभ्यासिका सुविधा पुरविण्यात येतात.

या वसतिगृहात प्रवेश प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांनी वसतिगृह कार्यालयात 10 ते 6 या वेळेत संपर्क साधावा. शासनाकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचे आदेश येईपर्यंतच्या कालावधीत कागदपत्रे जोडून ऑफलाईन अर्ज सादर करण्यातत यावा. हे प्रवेश अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामूल्य स्वरूपात उपलब्ध होतील. संपर्कासाठी पता :-प्र. गृहपाल, श्रीमती के.एस.गिरी, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, महाड, हॉटेल सीमा गार्डन शेजारी, चांभारखिंड, ता.महाड जि. रायगड

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक