माणगाव शहराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची ग्वाही

 



 

           अलिबाग, जि.रायगड, दि.25 (जिमाका) : माणगाव  शहराच्या  विकासासाठी  आपण  कटिबद्ध  असल्याचे पालकमंत्री  कु.आदिती  तटकरे  यांनी  आज गुरुवार, दि.25 फेब्रुवारी  रोजी     माणगाव   नगरपंचायत  हद्दीतील  विविध  विकासकामांच्या   भूमीपूजन  समारंभप्रसंगी  ग्वाही  दिली.

         पालकमंत्री  आदिती  तटकरे  पुढे  म्हणाल्या  की, खासदार सुनिल तटकरे  यांनी  माणगाव  शहराच्या  विकासासाठी  गेल्या  अनेक  वर्षांपासून  जातीने  लक्ष  घातले  आहे. याची  जाणीव  ठेवून  मी देखील  माणगाव  नगरीच्या  विकासासाठी  प्रयत्नशील  आहे. माणगावकरांना  अभिप्रेत  असणारी  सर्वच  कामे  आपण  टप्प्याटप्प्याने  पूर्ण करू. शहरातील  मुख्य  रस्ते  असतील, अंतर्गत  रस्ते  असतील , सामाजिक  सभागृह  असतील  यांसारखी  विविध  विकासाची  कामे  आपण  येणाऱ्या  काळात  निश्चितच  करू. शहरातील  भेडसावणाऱ्या  समस्यांच्या  निराकरणासाठी चालना  देण्याचे  काम  यापुढेही  आपण  करणार  आहोत.  जुने  माणगाव  येथील  मुख्य  रस्त्याचे  उर्वरित  कामही  लवकरच  करू,  असे  सांगत  नाट्यगृहाच्या  चारही  बाजूनी  संरक्षक   भिंत  केली  जाईल  असेही त्या म्हणाल्या.

राज्यात  मुख्यमंत्री  उद्धव  ठाकरे     उपमुख्यमंत्री  अजितदादा  पवार  यांच्या  नेतृत्वाखाली  महाविकास  आघाडीचे  सरकार  चांगले  काम  करीत  असून  या  सरकारमार्फत  विकासकामांना  प्राधान्य   दिले जात आहे.  कोविडच्या  संकटामुळे  राज्याची  ढासळलेली  अर्थव्यवस्था  हळूहळू  रुळावर  येत  असून  टप्प्याटप्प्याने  विकासकामे  पूर्ण करण्यात येतील , असेही  पालकमंत्री  कु.आदिती  तटकरे  शेवटी म्हणाल्या.  

          यावेळी  माणगाव  नगरपंचायत  हद्दीतील  उपविभागीय  कार्यालय  माणगाव  येथील  वीर  यशवंतराव  घाडगे  यांच्या  स्मारकाचे  भूमीपूजन,  वार्ड क्र.3 मध्ये   प्रभाकर  कासारे  ते  मंगेश  बक्कम  यांच्या  घरापर्यंतचा  रस्ता, सकपाळ  चाल  ते  खिडबिडे  यांच्या  घरापर्यंतचा  रस्ता,  तसेच  शिंदे  ते  मुनेश्वर  यांच्या  घराकडे  जाणारा  रस्ता    वामन  पवार  ते  प्रफुल्ल  गवळी  यांच्या  घराकडे  जाणारा  रस्ता, वार्ड क्र.8  मधील  नवीन  मध्यवर्ती  प्रशासकीय  भवनापासून  ते  डॉ.वैद्य  यांच्या  घरापर्यंतचा  रस्ता  डांबरीकरण  करणे, वार्ड  क्र.5 मध्ये  कचेरी  रोड  गार्डनजवळ  नवीन  पाईप  लाईन  टाकणे, बामणोली  रोड  कालवा  रस्त्याचे  डांबरीकरण  करणे    रस्त्यालगत  गटार  बांधकाम  करणे, वार्ड  क्र.16  मधील रेस्ट  हाऊस  ते  कुंभारवाड्याकडे  जाणारा  रस्ता  डांबरीकरण  करणे  आदी  विकासकामांचा  शुभारंभ  पालकमंत्री  कु.आदिती  तटकरे  यांच्या हस्ते  करण्यात  आला.

यावेळी माजी  नगराध्यक्ष  आनंदशेठ  यादव, माजी  उपनगराध्यक्ष  रत्नाकर  उभारे,  उपविभागीय  अधिकारी  प्रशाली  जाधव-दिघावकर, तहसिलदार  प्रियांका  आयरे-कांबळे, नायब  तहसिलदार  बी.वाय.भाबड, योगिता  चव्हाण, रवींद्र  मोरे, महामूद  धुंदवारे, संगिता  बक्कम, , संदीप  खरंगटे, दिलीप  जाधव, शुभांगी  जाधव,  नितीन  वाढवळ, जयंत  बोडेरे, रिया  उभारे,  माधुरी  मोरे, हर्षदा  काळे, सानिया  शेठ, हेमंत  शेट,   अकबर  परदेशी,  सुमित  काळे, मयूर  शेट, चेतन  गव्हाणकर, शशिकांत  मोहिते, उद्धव  जाधव  आदींसह माणगावचे ग्रामस्थ  मोठ्या  संख्येने  उपस्थित  होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक