'दिलखुलास' कार्यक्रमात रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग-3 झाला प्रसारित

 


अलिबाग,जि.रायगड दि.26 (जिमाका) :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात करोनाशी सामना करताना या विषयावर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या विशेष मुलाखतीचा भाग--3 आज (दि.26 फेब्रुवारी) रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एअर या ॲपवरून प्रसारित झाला.

              एकूण तीन भागातील ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एअर या ॲपवरून बुधवार,दि.24 फेब्रुवारी, गुरुवार, दि.25 फेब्रुवारी आणि शुक्रवार, दि.26 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 7.25 वाजता प्रसारित करण्यात आली. निवेदक प्रा. सुभाष कदम यांनी ही मुलाखत घेतली.

             रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून सुरू असलेल्या उपाययोजना, करोना काळात सरकारी आदेशांचे पालन, कंटेनमेन्ट झोन करताना उद्भवलेल्या अडचणी, करोना काळातील नवीन अनुभव अशा अनेक विषयांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली.   

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक