कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार समितीचे गठन करणे बंधनकारक --जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उज्वला पाटील

 


अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका) :- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे बंधनकारक आहे.  त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, संस्था, महामंडळे, स्थानिक प्राधिकरण, शासकीय कंपनी, नगरपरिषद, सहकार, खाजगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम संस्था, इंटरप्रायझेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, सेवा पुरवठादार संस्था, विरतण व विक्री, वाणिज्य, व्यावसायिक संस्था, शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, रुग्णालये, सुश्रुशालये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडासंकुल इ. आस्थापनांनी आपल्या आस्थापनेत अंतर्गत तक्रार समिती गठीत झाल्याचा तसेच तक्रार प्राप्त असल्यास प्राप्त तक्रारीचा अहवाल विहित नमुन्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नीलपुष्प बंगला, नागडोंगरी, एमआयडीसी ऑफिससमोर, अलिबाग  (ई-मेल आयडी wcdora@gmail.com, दू.क्र.02141-225321) कार्यालयास तात्काळ सादर करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती उज्वला पाटील कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक