मार्च महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार दि.5 रोजी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26 :- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन मार्च महिन्यात सोमवार दि.4 रोजी महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने मंगळवार दि.5 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि.4 मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार सार्वजनिक सुट्टीच्या नंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार मार्च महिन्याच्या लोकशाही दिन मंगळवार दि. 5 मार्च रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी रायगड यांनी कळविले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक