वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी ऑनलाईन शुल्क



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1 उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेणे येथे ऑनलाईन वाहन 4.0 संगणक प्रणालीचा वापर नोव्हेंबर 2017 पासून सुरु करण्यात आला आहे. या संगणक प्रणालीवर वाहन विषयक सर्व कामकाज करण्यात येत आहे.  1 मार्च पासून ऑटोरिक्षासह सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व त्यासाठीच्या ऑनलाईन अपॉईटमेंट कामकाज  व शुल्क भरणा ऑनलाईन करण्यात यावा.ऑनलाईन अपॉईटमेंट घेऊन  ऑनलाईन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण शुल्क भरणा केल्यानंतर नियोजित दिवशी व वेळी वाहन खटला विभागातील केस किंवा हरकत नसल्याचा शेरा घेऊन जिते येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणीसाठी हजर करावे. वाहन धारकांनी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन किंवा नागरी सुविधा केंद्रातूनही (CSC) सेंटरमधून व सायबर कॅफेतून ऑनलाईन अपॉईटमेंट घेता येईल. अपॉईटमेंट घेण्यासाठी www.parivahan.gov.in या वेबसाईट मध्ये Online Services व त्यानंतर Vehicle related service पर्याय निवडा त्यानंतर Vehicle Number टाकून आपण योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण (Apply for Fitness Renewal) हा पर्याय निवडण्यात यावा व संगणकप्रणालीवर दिलेल्या सूचनांचे पालन करुन Slot Booking व ऑनलाईन शुल्क भरावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक