पनवेल येथे विविध विकासकामांचा शुभारंभ लोकप्रतिनिधी व प्रशासन विकासाची दोन चाके - पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 :-  शेवटच्या व्यक्तिपर्यंत विकास पोहोचण्यासाठी विकासाच्या रथाची दोन्ही चाके म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्र काम केले, तरच फायदा होतो याचा प्रत्यय पनवेलच्या नागरिकांना येत आहे,असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 2) पनवेल येथे केले.
पालकमंत्री ना.चव्हाण यांच्या हस्ते पनवेल मनपा हद्दीतील 96 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, उपमहापौर विक्रांत पाटील,  सभागृह नेते परेश ठाकूर, वाय. टी. देशमुख, अरुणशेठ भगत, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, राजू सोनी, सभापती लीना गरड, नगरसेविका चारुशीला घरत, मुग्धा लोंढे, दर्शना भोईर, नगरसेवक नितिन पाटील, अनिल भगत, प्रकाश बिनेदार, तेजस कांडपिळे, पं. स. सदस्या रत्नाताई घरत, जयंत पगडे, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ  आणि नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्र्यांनी नवीन मराठी शाळेच्या बांधकामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल महापौर आणि नगरसेवकांचे कौतुक केले.या शाळेच्या पाठीमागे शासन उभे राहील. याबरोबरच महापालिकेत आलेल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळाही वर्ग करून घ्याव्यात,अशी सूचना केली.
आमदार तथा सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी पालकमंत्र्यांचा आदर्श घेऊन काम करताना त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन विकासाकडे झेपावत आहोत. तीन महिन्यांत 100 कोटीपेक्षा जास्त कामे करण्यात येत आहेत,असे सांगितले.
यावेळी ना.चव्हाण यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिका हद्दीतील गावामध्ये स्ट्रीट लाईटचे पोल उभारणे, वडाळे तलावाचे सुशोभिकरण, नॅशनल पॅराडाईज सोसायटी ते गोदरेज स्काय गार्डन ते अं.भू.क्र.399 व राष्ट्रीय महामार्ग क्र.04(अ.भू.क्र.307) ते पनवेल रेल्वे स्टेशन पर्यंत रस्त्याच्या काँक्रीटीकरण, प्रॉ.क्र.1033-अ येथे समाज मंदिर बांधकामाचे भूमीपूजन, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभिकरण, प्राथमिक मराठी कन्या शाळेच्या बांधकाम आदी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक