सरदार पटेल राष्ट्रीय ऐक्य पुरस्काराकरिता व्यक्ती/संस्थांनी अर्ज करावेत


अलिबाग, दि.26 (जिमाका):- देशाचे ऐक्य व अखंडता या क्षेत्रात काम करणाऱ्या व योगदान देणाऱ्या आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना राष्ट्रीय एकता दिन म्हणजेच दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी सरदार पटेल राष्ट्रीय ऐक्य पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याकरिता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या www.awards.gov.in या पोर्टलवर दि.31 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 

तरी देशाचे ऐक्य व अखंडता या क्षेत्रात काम करणाऱ्या व विशिष्ट उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक