स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याची दिंडी अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेची अभिनव संकल्पना; जिल्ह्यात विविध उपक्रमांचे होणार आयोजन


अलिबाग, दि.26 (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याला दि.15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान जाहीर केले आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबत रायगड जिल्हा परिषद स्वातंत्र्याची दिंडी हा उपक्रम दि.09 ते दि.16 ऑगस्ट दरम्यान राबविणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजविणे, वृक्षलागवड, स्वच्छता मोहीम राबविणे यासह इतर बाबींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.

संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानुषंगाने जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारने घरोघरी तिरंगा हे अभियान जाहीर केले आहे. यांतर्गत दि.13 ते दि.15 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. रायगड जिल्हा परिषदेमार्फत या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमातून शिवणक्षेत्रात कार्यरत महिला बचतगटांना रोजगार मिळणार आहे. त्यांना झेंडे तयार करण्यास सांगण्यात आले असून झेंडे विक्रीसाठी महिला महोत्सवात झेंडा विक्री स्टॉल तसेच ग्रामपंचायत स्तरावर सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त शाळांमध्ये झेंडा विक्री सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त रायगड जिल्हा परिषद स्वातंत्र्याची दिंडी उपक्रम राबविणार आहे. यांतर्गत घरोघरी तिरंगा या अभियानाबाबत जनजागृती करणे, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, बचतगट मेळावे, स्वच्छता मोहीम, वृक्षलागवड, प्रभात फेरी, विद्यार्थ्यांना देशभक्तीपर चित्रपट दाखविणे, असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

स्वातंत्र्याची दिंडी उपक्रमांतर्गत जिल्ह्यात दि.09 व 10 ऑगस्ट - विद्यार्थ्यांची जनजागृती प्रभातफेरी, दि.11 व 12 ऑगस्ट - विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी स्पर्धा, दि.11 ते 15 ऑगस्ट - बचतगट मेळावा, दि.13 ऑगस्ट - प्लास्टिक संकलन व स्वच्छता मोहीम, दि.13 ते 15 ऑगस्ट - घरोघरी झेंडा फडकविणे, दि.14 ऑगस्ट – वृक्षलागवड, दि.15 ऑगस्ट - स्वातंत्र्यसैनिकांच्या पोस्टर्ससह विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, दि.16 ऑगस्ट - विद्यार्थ्यांना देशभक्तीपर चित्रपट दाखविणे, असे विविध देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

तरी या उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील आबालवृद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक