“घरोघरी तिरंगा” अभियान जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय आणि प्रिझम सामाजिक विकास संस्थेचे संयुक्त प्रयत्न

अलिबाग, दि.28 (जिमाका):- घरोघरी तिरंगा अभियानाबाबत जनजागृती आणि प्रचार-प्रसार करण्याकरिता अलिबाग येथील प्रिझम सामाजिक विकास संस्थेमध्ये करियर मार्गदर्शन घेणाऱ्या युवकांशी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे दि.27 जुलै 2022 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी संवाद साधून त्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा अभियान यशस्वीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी 125 युवक-युवती उपस्थित होते. सर्वांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून कार्य करणार असल्याचा निर्धार केला. विविध आदिवासी पाड्यांवर जावून या अभियानाबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक व त्यांचे सहकारी अधिकारी-कर्मचारी तसेच प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती तपस्वी गोंधळी आणि मार्गदर्शक श्रीमती सुचिता साळवी जनजागृती करणार असून काही पाड्यांवर तिरंगाही वितरित करणार आहेत.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक