शामराव पेजे स्मृती न्यासातर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीकरिता कोकण व बृहन्मुंबई क्षेत्रातील कुणबी व तत्सम इतर मागास समाजातील इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत


अलिबाग, दि.26 (जिमाका):- शामराव पेजे न्यासातर्फे कोकण व बृहन्मुंबई क्षेत्रातील कुणबी व अन्य तत्सम इतर मागास समाजातील विद्यार्थी/विद्यार्थीनींकडून कार्यवाह, शामराव पेजे स्मृती न्यास द्वारा सर्वोदय छात्रालय, डॉ.बा.ना.सावंत रोड, रत्नागिरी, पिन कोड 415612 या पत्यावर अर्ज मागविण्यात आले असून अर्ज याच पत्त्यावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीकरिता कार्यालयाच्या 9421706592 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

अर्ज वितरण व स्वीकारण्याचा कालावधी दि.25 जुलै 2022 ते दि.30 ऑगस्ट 2022 (सार्वजनिक सुट्टीचा दिवस व रविवार वगळून) वेळ- सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत असा आहे. या तारखेनंतर अर्ज दिले व स्विकारले जाणार नाहीत. मनिऑर्डरने रु.15/- पाठविल्यास अर्ज पोस्टाने पाठविला जाईल. मनिऑर्डर कूपनवर लाभार्थीचे पूर्ण नाव, पत्ता व फोन नंबर लिहिणे आवश्यक आहे. अपुऱ्या पत्त्यामुळे वा पोस्टाच्या दिरंगाईमुळे विहित मुदतीत अर्ज न मिळाल्यास त्यास हे न्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही.

सर्वसाधारण वार्षिक शिष्यवृत्तीसाठी पात्रता: सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात 12वी पुढील पदवी / पदव्युत्तर/व्यावसायिक अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतील, अर्जदाराच्या पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न रु.01 लाख 20 हजार पेक्षा अधिक असता कामा नये.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात वरीलप्रमाणे शिष्यवृत्ती देण्याचे विश्वस्त मंडळाने ठरविले असल्याचे न्यासाचे अध्यक्ष श्री.सुजित झिमण यांनी कळविले असून जास्तीतजास्त गरजू विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक