जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण व सोडतीची कार्यवाही संपन्न

अलिबाग, दि.28 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील आदेश क्र. रानिआ/नप -2022/प्र.क्र. 02/का.6, दि. 22 जुलै 2022 अन्वये राज्यातील 115 नगरपरिषदा व 9 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम 2022 जाहीर करण्यात आला आहे.

त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण व सोडतीची कार्यवाही आज दि.28 जुलै 2022 रोजी पार पडली.

या आरक्षण व सोडतीबाबत हरकत व सूचना स्विकारण्याकरिता आरक्षणाची अधिसूचना नगरपरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच नगरपरिषद व इतर कार्यालयांच्या सूचनाफलकांवर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक