क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत


अलिबाग, दि.29 (जिमाका):- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राज्य शासनाच्या वतीने सन 2022 च्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतलेला असून https://does.google.com/forms/d/e/1FAIpQLSfnHr3svcX2S6Ky2qcGi8R4EYXWyVrLvF7E4f448GWvW9Q/viewform?pli=1 या वेबपोर्टलवर नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.

हे अर्ज ऑनलाईन मागविण्याची मुदत दि.28 जुलै 2022 रोजी पासून दि. 07 ऑगस्ट 2022 रोजीपर्यंत आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी दि.07 ऑगस्ट 2022 पर्यंत सदर पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रायगड जिल्हा परिषद श्रीमती ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक