महसूल दिन गुणगौरव सोहळा संपन्न : अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक- जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी




अलिबाग दि.1 ऑगस्ट :-  महसूल विभाग हा शासनाचा कणा असून महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.  अँग्लो इस्टर्न मेरिटाईम अकॅडमी खांडपे ता.कर्जत येथे आयोजित महसूल दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वैशाली माने, उपविभागीय अधिकारी श्रीमती शारदा पोवार अलिबाग, श्रीमती प्रतिमा पुदलवाड पेण, श्रीमती वैशाली परदेशी कर्जत, श्री. दत्तात्रय नवले पनवेल,श्री. विठ्ठल इनामदार महाड,श्री. प्रविण पवार श्रीवर्धन, श्री.बोंबले आदि उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले की, महसूल विभाग हा शासनचा कणा असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका कणखरपणे मांडून लोकाभिमुख काम करुन लोकांच्या जवळ जाणे अत्यंत महत्वाचे आहे. शासनाचे नवनवीन उपक्रम येत असून हे उपक्रम योग्य रितीने राबविण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य व जबाबदारी म्हणून काम केले पाहिजे. महसूल विभाग जनसामान्यांशी संबंधित विभाग आहे. त्यामुळे सर्वांनी लोकांच्या हितासाठी काम करावे अशा सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचा गौरव करणे यासाठी महसूल दिन साजरा केला जातो. कर्मचाऱ्यांच्या ज्या हक्काच्या गोष्टी आहेत ते त्यांना देणे व काही अडी अडचणी सोडविल्या जातील. असेही ते यावेळी म्हणाले.
10 वी 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी व इतर कला/सांस्कृतिक/क्रिडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
कु.हर्ष मिलींद तिऱ्हेकर इ.10वी 94 % गुण, कु.पारस उदय पाटील 12 वी  92.15 % गुण, कु.वैष्णवी किशोर मालूसरे इ.10 वी 90.20 % गुण, कु.अनुष्का अमृत चोगले, इ.10 वी 88.60 % गुण, कु.यर्शोधन बाळासाहेब बांगर इ.10 वी 86 % गुण, कु.समृध्दी धनंजय कांबळे इ.10 वी 80.40 % गुण, कु.गौरव चंद्रकांत गायकवाड इ.10 वी 81 % गुण, कु.श्रध्दा संजय नागांवकर बीएससी 72.16 % गुण.
अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सत्कार
प्रविण जानू पवार, उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन, आण्णाप्पा महादेव कनशेट्टी तहसिलदार तळा, यशवंत पी.वैशंपायन नायब तहसिलदार, श्रीमती सुरेखा अशोक घुगे निवडणूक नायब तहसिलदार, सचिन प्रभाकर गोसावी नायब तहसिलदार, समीर दिवाकर देसाई नायब तहसिलदार, प्राची गुरुनाथ भोईर अव्वल कारकून, मेघा हरिश्चंद्र पाटील अव्वल कारकून, मनोज मारुती गोतारणे अव्वल कारकून, राकेश बळीराम सावंत अव्वल कारकून, गोविंद राम सागर लिपिक-टंकलेखक, विनय वसंत पोटसुरे लिपिक-टंकलेखक, विद्या जयंत दबडे लिपिक-टंकलेखक, फणीद्र मढवी लिपिक-टंकलेखक, नारायण गोविंद गोयजी मंडळ अधिकारी, रत्नाकर मोतिराम सूर्यवंशी मंडळ अधिकारी, कल्याण शंकरराव देऊळगांवकर मंडळ अधिकारी, संतोष मोतिराम पाटील मंडळ अधिकारी, अस्मिता अशोक सावंत तलाठी, नामदेव पोशा ठाकूर तलाठी, मारुती परशुराम मळेकर तलाठी, सानिका पाटील तलाठी, प्रसाद माळी वाहन चालक, स्वप्निल माळवी वाहन चालक महेंद्र महाडीक वाहन चालक, आनंद पवार शिपाई, अरुण भादुर्गे शिपाई, देविदास चव्हाण शिपाई, यशवंत पवार शिपाई, अरुण हातमोडे कोतवाल, गोविंद वनगले कोतवाल, अमोल शिगवण कोतवाल, सुनिल सोनावणे कोतवाल यांचा सत्कार जिल्हाधि-यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.शितोळे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वैशाली माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महसूल विभागातील सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळअधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000




Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक