मुंबई गोवा हायवे वरील वाहतूकीत बदल



अलिबाग दि.31 जुलै :-  जेएसडब्ल्यु स्टील लिमिटेड प्रकल्पाची 600 मी.मी. व्यासाची जुनी पाईपलाईन ज्यामार्फत 45 गावांना पाणी पुरवठा केला जात आहे, त्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे कामाकरीता दि.01/08/2019 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई गोवा हायवे वरील गोव्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतुक ही वाकण ब्रीज (वाहतुक पोलीस चौकी) - आमडोशी - एम.आय. डी.सी. रोड - रिलायन्स चौक सर्कल - होली एंजल्स स्कुल मार्गे हायवे अशी, तर मुंबई बाजूकडून येणारी वाहतुक ही रिलायन्स कमान - रिलायन्स चौक व तेथुन एम.आय.डी.सी. रोड - आमडोशी मार्गे - वाकण ब्रीज (वाहतुक पोलीस चौकी) - हायवे या मार्गाने वळविण्याचे आदेश डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हादंडाधिकारी रायगड यांनी जारी केले आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड