कौशल्य विकास योजनांच्या लाभासाठी सेवायोजन नोंदणीकार्ड आधार लिंक करा

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.19 (जिमाका) :- कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या नाव नोंदणीमध्ये आधार कार्ड ऑनलाईन पध्दतीने लिंक करुन नोंदणीतील माहिती दि.31 ऑगस्ट 2020 पर्यंत अद्यावत  करणे आवश्यक आहे. याकरीता सेवायोजन कार्यालयातील नाव नोंदणीमध्ये आपल्या आधार कार्ड नोंदणी क्रमांकाचा  समावेश न केलेल्या उमेदवारांनी आपला युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आधार कार्ड क्रमांकासह आवश्यक असलेली आपली सर्व माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या  https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर दि.31 ऑगस्ट, 2020 पर्यंत अद्ययावत करावी.

तसेच वेबपोर्टलवरील उपलब्ध असलेली नोकरी/व्यवसाय इ. बाबतची माहिती प्राप्त करण्यासाठी वेळोवेळी वेबपोर्टलवर लॉग-इन करावे. ही माहिती दि.31 ऑगस्ट, 2020 पर्यंत वेबपोर्टलवर अद्ययावत न केल्यास वेबपोर्टलवरील आपली नोंदणी रद्द करण्यात येईल. वेबपोर्टलवरील  माहिती अद्ययावत करताना काही समस्या येत असल्यास कार्यालयाच्या 02141-222029 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा alibagrojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शा. गि. पवार यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (सेवायोजन कार्यालय) या कार्यालयात किंवा वेबपोर्टलवर नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना नोकरीसाठी सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पध्दतीने बेवसाइटच्या माध्यामातून देण्यात येतात. राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्यांची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता वाढ करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे. 

         

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक