स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात उत्साहात साजरा समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध --- ना योगेश सागर



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15-  समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याचे, प्रतिपादन राज्याचे नगर विकास राज्यमंत्री ना.योगेश सागर यांनी आज येथे केले. अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे मुख्य ध्वजारोहण त्यांचे हस्ते संपन्न झाले.   त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीम.शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीम.वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,पजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती आदी मान्यवर उपस्थित होते. 
ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी मानवंदना दिली.     ध्वजारोहणानंतर नगर विकास राज्यमंत्री ना.योगेश  सागर यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.  
उपस्थितांना संबोधतांना ना.श्री.सागर म्हणाले की,जिल्ह्यात पालकमंत्री श्री.रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व  जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या नेतृत्वामध्ये अतिवृष्टीमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या माध्यमातून एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दल, भारतीय सैन्य दल, रायगड जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलातील सदस्य संस्था, वाईल्डर वेस्ट ॲडव्हेंचर, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था अशा विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक, पोलीस विभाग, महसूल विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील जवळपास 3 हजार 382 पेक्षा अधिक पर्यटक, नागरिकांची जलद बचाव कार्य करुन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यामुळे मोठ्याप्रमाणात जिवीत हानी टाळण्यास यश आले  यावेळी त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.  मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकास आराखड्यानुसार आतापर्यंत 8 कामे पूर्ण झाली असून इतर कामे प्रगती पथावर आहेत.

तसेच मा. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिर्वतन अभियान अंतर्गत रायगड जिल्हयातील 22 गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत असून सन 2018-19 मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक बारसगांव, ता.महाड, व्दितीय क्रमांक खरसई, ता.म्हसळा व तृतीय क्रमांक मुठवली, ता.माणगांव आलेला आहे.
या समारंभात ना. सागर यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्राप्त अधिकारी,कर्मचारी व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. व्हिलचेअर तलवार बाजीत दिव्यांग खेळाडू संदीप प्रल्हाद गुरव यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.  
विविध पुरस्कार
 जिल्हा विज्ञान प्रदर्शन 2018-19 प्राथमिक विद्यार्थी-जनरल गट : सलोनी लक्ष्मण भोसले रा.जि.प.भावेपठार ता.महाड, मल्हार सुधीर जाधव आद्य क्रांतीवीर वा.ब.फडके विद्यालय नवीन पनवेल, महेक संदिप टेंबे इंग्लिश स्कूल जावळी ता.माणगाव.  प्राथमिक विद्यार्थी-आदिवासी गट : जनार्दन कोंडीराम मोरे न्यू इंग्लिश स्कूल वावर्ले ता.पनवेल. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी-जनरल गट :  अमन कुमार राजेश सिंह व्ही.के.हायस्कूल ॲण्ड ज्यु.कॉलेज पनवेल,  शर्वरी मिलिंद कदम अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत,  कल्याणी सुधीर जाधव को.ए.सो.चे.ना.ना.पाटील हायस्कूल पोयनाड ता.अलिबाग.  प्राथमिक  व माध्यमिक शिक्षक लोकसंख्या शिक्षण प्राथमिक गट : नामदेव ज्ञानू टिपुगडे रा.जि.प.शाळा बोरघर हवेली आदिवासीवाडी ता.तळा. माध्यमिक गट :- अंजना ज्ञानदिप भोईनकर-एस.एस.के.ज्युनिअर कॉलेज,  बोर्ली पंचतन ता.श्रीवर्धन.  निवडप्राप्त प्रयोगशाळा सहाय्यक/प्रयोगशाळा परिचर-वैज्ञानिक साधने :- राजन सदाशिव तरे-को.ए.सो.चे ना.ना.पाटील हायस्कूल, पोयनाड ता.अलिबाग
अलिबाग निवडप्राप्त  प्राथमिक शिक्षक/माध्यमिक शिक्षक-शैक्षणिक साहित्य प्राथमिक गट :- विकास नरहरी पाटील-रा.जि.प.शाळा भेंडखळ, ता.उरण. माध्यमिक गट :- जयश्री यल्लपा वैदू-के.आय.पी. माध्यमिक विद्यालय पनवेल, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी व 8 वी) मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी  प्रमाणपत्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रायगड जिल्हा परिषद अलिबाग :- कु.जान्हवी मुकेश मोकल, कारमेल स्कूल पेण. कु.आर्या सचिन इंगळे, डेविड इंग्लिश मिडीयम स्कूल चोंढी, कु.श्रेया सुरेश शिंगटे, श्री वरदायनी माध्यमिक विद्यालय पोलादपूर, कु.श्रेयस अविनाश देशपांडे, पेण शिक्षण महिला समिती इंग्लिश मिडीयम स्कूल पेण.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2017-18 इ. 10 वी प्रमाणपत्र :- कु.पोतदार संकेत राजेंद्र डी.ए.व्ही.पब्लीक स्कूल पनवेल.
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार-2017 पुरस्काराचे स्वरुप : सन्मान चिन्ह प्रमाणपत्र 50 हजार रुपये रक्कमेचा धनाकर्ष व लेदर बॅग. प्रथम क्रमांक श्री.ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ ता.पनवेल जि.रायगड.


जिल्हा क्रिडा पुरस्कार सन 2018-19 प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व रोख रु.10,000/- : गुणवंत क्रिडा कार्यकर्ता श्री.दिपक गजानन पाटील, गुणवंत खेळाडू पुरस्कार पुरुष :- श्री.राज विनायक पाटील,गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला :- कु.मानसी दिलीप गावडे,जिल्हा युवा पुरस्कार सन 2018-19,  जिल्हा युवा पुरस्कार संस्था :- गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रु.50,000/- स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था सानेगाव ता.रोहा. जिल्हा युवा पुरस्कार युवक :- गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रु.10,000/- कु.रोशन विष्णू चाफेकर. जिल्हा युवा पुरस्कार युवती :- गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रु.10,000/- कु.शितल सुधीर म्हात्रे.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत शोध व बचाव कार्य करणाऱ्या संस्था/अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सन्मान
महेश सानप-वाईल्डर वेस्ट ॲडव्हेंचर स्पोटर्स कोलाड ता.रोहा, गुरुनाथ साठेलकर, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था खोपोली, सचिन शिंदे निसर्ग मित्रमंडळ सामाजिक संस्था पनवेल, राजू पिचिका पेण, जैन समाज पेण, सचिन मधुकर पाटील कणे, ता.पेण, संदेश कमलाकर गडखळ वेलटवाडी ता.अलिबाग, जितेंद्र अनंत गोंधळी, खानाव ता.अलिबाग, संजय सारंग पथक प्रमुख सुरक्षा रक्षक अलिबाग, सागरी सुरक्षा पथक भिलजी ता.अलिबाग, सागरी सुरक्षा पथक रामराज ता.अलिबाग, अशोक धोंडू तांबडे, पोलीस पाटील मीठेखार ता.मुरुड, अध्यक्ष लायन्स क्लब, अलिबाग, अनिल रामचंद्र माने, चिंचवलीवाडी ता.माणगांव, बबन गणपत माने, चिंचवलीवाडी ता.माणगांव, ऋषीकेश अनंत लकेश्री नाते, ता.महाड, अनिल रामराव मोरे, बिरवाडी ता.महाड, लक्ष्मण गजानन वाडकर बिरवाडी ता.महाड, विजय लक्ष्मण जाधव आसनपोई ता.महाड, चैतन्य प्रकाश म्हामुणकर, आकले ता.महाड, संदिप गोपाळ झांजे, ता.महाड, उमेश अशोक मिंडे, ता.महाड, सचिन रमेश भिंडे ता.महाड,सिध्देश सुरेश निवाते ता.महाड, चिंतर वैश्नव ता.महाड, रोशन रविंद्र रुईकर, ता.सुधागड पाली, मंगेश मारुती मुळे, ता.सुधागड पाली, अजय अजित मुळे ता.सुधागड-पाली यांनाही प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या समारंभासाठी स्वातंत्रसैनिकांच्या पत्नी, जिल्ह्यातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी  तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्य ध्वजारोहण  कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
                                                           000 000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक