जागतिक एड्स दिनाच्या रॅलीचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते उद्घाटन

दिनांक:- 1/12/2016                                                                                         वृत्त क्र. 771
जागतिक एड्स दिनाच्या रॅलीचे
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते उद्घाटन


अलिबाग, दि.01 :- (जिमाका) जागतिक एड्स दिन 2016 निमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग यांच्यातर्फे रॅलीचे आयोजिन करण्यात आले होते.  रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
या प्रसंगी त्वचा व गुप्तरोग तज्ज्ञ डॉ.श्री.ननावरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ.सुरेश देवकर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.पांडूरंग शिंदे, डॉ.मेघा घाटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या श्रीमती पुष्पा मगर, ॲड.निहा राऊत,प्रिझम सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष तपस्वी गोंधळी आदी उपस्थित होते. .
रॅलीची सुरूवात जिल्हा सामान्य रुग्णालय येथून करुन एस.टी.स्टँड सर्कल मार्गे परत फिरून शिवाजी पुतळयावरुन  बालाजी नाका ते रक्तपेढी प्रांगण जिल्हा सामान्य रुग्णालय येथे संपविण्यात आली.   सदर रॅलीमध्ये एड्सविषयी घोषणा देण्यात आल्या. रॅलीच्या उदघाटनापूर्वी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डापकू संजय माने उपस्थित युवक युवतींना एचआयव्ही, एड्स विषयी शपथ दिली.   
जागतिक एड्स दिन व सप्ताहाचे औचित्य साधून रॅली संपल्यानंतर रायगड जिल्ह्यातील एकूण 16 आयसीटीसींपैकी उत्कृष्ट आयसीटीसी केंद्र म्हणून  जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील आयसीटीसी 02 मधील समुपदेशक श्रीमती कल्पना गाडे व प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमित सोनावणे यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक स्वरुपा संदीप जाधव, द्वितीय क्रमांक विनीता रविंद्र पाटील, तृतीय मृणाली अभिमन्यू पाटील या नर्सिंग स्कूलमधील विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.  त्याचप्रमाणे स्लोगन स्पर्धेतील प्रथम जुईली जयंवत पाटील जा.र.ह.कन्याशाळा अलिबाग, द्वितीय तुषार बाळाराम म्हात्रे नर्सिंग स्कूल, तृतीय लावण्या महेश घाडगे जा.र.ह.कन्याशाळा यांना पारितोषिक देऊन  सत्कार करण्यात आला. 
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, जिल्हा पर्यवेक्षक नवनाथ लबडे, जि.सहा.लेखा रविंद्र कदम, जि.सह.एम.ॲण्ड ई.श्रीमती रश्मी सुंकले, जि.सहा.कार्यक्रम श्रीमती संपदा मळेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.नालंदा पवनारकर, समुदेशक अंकुश राठोड, श्रीमती कल्पना गाडे, श्रीम.अर्चना जाधव, राजकुमार बिराजदार, श्रीम.दिप्ती चव्हाण,प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमकांत सोनार, अमित सोनवणे, श्रीम.सुजाता तुळपुळे, गणेश सुतार,श्रीम.विदुला नटे, श्रीम.कोमल लोखंडे,श्रीम.पल्लवी पडवळ, श्रीम.सायली म्हात्रे,किरण पाटील, महेश घाडगे, रुपेश पाटील, संकेत घरत यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला. 
या कार्यक्रमाला जनरल अरुणकुमार वैद्य, जा.र.ह.कन्याशाळा अलिबाग, नर्सिंग स्कुल, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक