आगामी गणेशोत्सवानिमित्तची तयारी, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार पालकमंत्री कु.आदिती तटकरे


अलिबाग, जि.रायगड, दि.6 (जिमाका)- आगामी रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सव-2020 निमित्त करावयाच्या उपाययोजना व कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन राज्यमंत्री, उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि.7 ऑगस्ट, 2020 रोजी, दुपारी 3.00 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे आयोजित करण्यात आली आहे.     

             या बैठकीस जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हास्तरीय विभाग प्रमुख तर तालुकास्तरीय विभागप्रमुखांना व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक