21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन
रायगड(जिमाका) दि.17 :- शारीरिक आणि अध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्त्व विचारात घेऊन प्रतीवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने "21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून घोषित केला आहे. त्यानुषंगाने दि.21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमास जिल्हा प्रशासनांतर्गत असलेले सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, नामांकित खेळाडू आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात योगदिन साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यातसंदर्भात (दि.16 जून) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. यावेळी शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, जिल्हा युवा अधिकारी अमित फुंडे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्रीमती तपस्वी गोंधळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यासमन्वयाने दि.21 जून 2025 हा दहावा आतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली येथील प्रशस्त बॅडमिंटन हॉलमध्ये साजरा केला जाणार आहे. योगविषयक प्रचार व प्रसार करण्यासाठी या दिनाचे महत्त्व विचारात घेऊन चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
००००००
Comments
Post a Comment