सरळ प्रवेश व कौशल्य चाचणीव्दारे निवासी व अनिवासी खेळाडूकरीता प्रवेश जिल्हास्तरावर चाचण्यांचे आयोजन
रायगड(जिमाका)दि.20:- महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतूलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरविण्याकरीता शिवछत्रपती क्रीडापीठ, बालेवाडी पुणे अंतर्गत राज्यातील कार्यरत असलेल्या 9 क्रीडाप्रबोधिनीत सरळ प्रवेश (50%) व कौशल्य चाचणी (50%) प्रक्रिये अंतर्गत निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी दिली आहे.
जिल्हास्तरीय प्रवेश चाचण्या ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन,आर्चरी, हॅण्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सिंग अशा 17 क्रीडा प्रकारात आयोजित केली जात असते. यापैकी ज्या चाचण्यांचे जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर आयोजन केले जाणार आहे, त्या चाचण्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील.
जिल्हास्तर चाचण्या कालावधी दि.24 जून 2025 सकाळी 9.00 वाजता. प्रवेश चाचण्यांचे खेळप्रकार हॅण्डबॉल, जलतरण, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, फुटबॉल, सायकलिंग. प्रवेश अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक 23 जून 2025. उपस्थितीचे ठिकाण व वेळ, तालुका क्रीडा संकुल, पनवेल सकाळी 9.00 वाजता. विभागीय चाचण्यांचा अंदाजित कालावधी दि.26 ते 27 जून 2025. राज्यस्तर चाचण्यांचा अंदाजित कालावधी व ठिकाण दि. 05 ते 8 जुलै 2025 ठिकाण-शिवछत्रपती, क्रीडापीठ बालेवाडी व नागपूर क्रीडा प्रबोधिनी. वयोमर्यादा- 07 जुलै 2006 नंतर जन्मलेले व 08 जुलै 2025 रोजी पर्यंत 19 वर्षे पुर्ण झालेले खेळाडू.
000000
Comments
Post a Comment