थकीत लाभार्थीनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम भरुन कर्ज खाते बंद करावे

 

रायगड(जिमाका)दि.20:- महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित आणि विकास महामंडळ मर्या. मुंबई यांची उपकंपनी असलेले शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ यांचे जिल्हा कार्यालय रायगड मार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आले आहे. सदर लाभार्थीना कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात येते. विहित मुदत संपून गेली असताना देखल बऱ्याच लाभार्थीनी महामंडळाकडे शिल्लक रकमेची परतफेड अद्याप केलेली नाही. त्यामुळे ज्या थकीत लाभार्थीनी थकीत मुद्दल व थकीत व्याज रक्कमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे जेणेकरुन भविष्यात होणारी संभावित कायदेशर कार्यवाही टाळावी, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महाडमंडळाचे जिल्हा व्यवस्थापक गंगाधर डोईफोडे यांनी केले आहे.

थकीत लाभार्थीनी कर्ज खाते बंद केल्यास महामंडळाच्या सध्या सुरु असलेल्या नविन आकर्षक बिनव्याजी रु.15.00 लक्ष पर्यंत कर्जाच्या योजनेमध्ये लाभ घेता येईल. संपर्कासाठी कार्यालयाचा पत्ता : श्रीरामसमर्थ गृहनिर्माण संस्थामर्या., सदनिका क्र.१०१, पहिला मजला, चेंढरे, ता. अलिबाग, जि. रायगड (फोन नं.०२१४१-२२४४४८ई-मेल- dmobcalibagraigad@gmail.com वेबसाईट www.msobcfdc.org.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज