अलिबाग तहसिल कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका):- अलिबाग तहसिलदार कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, माणुसकी प्रतिष्ठान, अलिबाग आणि लायन्स क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज अलिबाग तहसिल कार्यालय येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी  मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

 या शिबिराचे उद्घाटन अलिबागच्या तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ.श्री. हुलवान, लायन्स क्लब, श्री. जित टोळकर, निवासी नायब तहसिलदार, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांची रक्तदाब, मधुमेह, दातांचे आरोग्य, थायरॉईड व सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक