अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करावेत

 


अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार केंद्रशासनाने अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या इ. 1 ली ते 10 वी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2008-09 पासून सुरु केली आहे.

यावर्षी NSP 2.0 पोर्टल वर नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात दि. 18 ऑगस्ट 2021 पासून सुरु झाली आहे. इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाद्वारे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.

इयत्ता 1 ली ते 10 वी मधील विद्यार्थ्यांचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज National Scholarship Portal (NSP 2.0) (www.scholarships.gov.in) या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्याने अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख दि.30 नोव्हेंबर 2021  असून शाळा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख दि.15 डिसेंबर 2021 अशी आहे. हे अर्ज भरण्याची सोय www.minorityaffairs.gov.in  या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे

तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या इ. 1 ली ते 10 वी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी जरुन घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या  शिक्षणाधिकारी श्रीमती ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक