राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड योजनेच्या लाभाकरिता पशुपालक/शेतकऱ्यांनी संपर्क साधावा

 

 

अलिबाग,दि.08(जिमाका):- केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेकरिता प्रति हेक्टर रु. 30 हजार प्रति लाभार्थी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत प्रति जिल्हा 15 हेक्टर क्षेत्राकरिता 4.5 लक्ष याप्रमाणे एकूण 34 जिल्ह्यांकरिता रु. 153 लक्ष निधी वितरित करण्यात आलेला आहे.

             या योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी, पशुपालकांना वैराणीकरिता शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येणार आहे. प्रति हेक्टर 7.5 किलो शेवगा (पीकेएम-1) बियाण्याची किंमत 6 हजार 750 व उर्वरित अनुदान रु. 23 हजार 250 हे दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे.  बियाण्याचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत, लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे.

               तरी या योजनेच्या लाभाकरिता इच्छुक असणाऱ्या पशुपालक, शेतकऱ्यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती आणि नजीकच्या पशुवैद्यकीय  दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक