युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडच्या महाराणी एलिझाबेथ II, यांच्या निधनाबद्दल 11 सप्टेंबर रोजी एक दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर


अलिबाग,दि.09 (जिमाका):- युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड यांच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय, यांचे दि.8 सप्टेंबर 2022 रोजी निधन झाले. या दिवंगत सम्राज्ञीच्या सन्मानार्थ, भारत सरकारने दि.11 सप्टेंबर 2022 रोजी संपूर्ण भारतामध्ये एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी संपूर्ण भारतामध्ये ज्या इमारतींवर राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकविला जातो, त्या सर्व इमारतींवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावरच फडकविला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम होणार नाही.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, ज्या इमारतींवर राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकविला जातो तेथील आस्थापनांनी तसेच नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक